Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी 21 इच्छुकांनी घेतली 'एनओसी'

Nashik Municipal Corporation | भाजपमध्ये रस्सीखेच : माजी नगरसेवकांसह माजी शहराध्यक्षांचीही उडी
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेला वेग आला आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना महापालिकेकडून कोणतीही थबकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे अनिवार्य असल्याने आतापर्यंत २१ इच्छुकांनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

Nashik Municipal Corporation
Mission Chara Plan | जून 2027 पर्यंत नाशिक जिल्हा राहणार पूर्णपणे टंचाईमुक्त; प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी 'मिशन चारा' प्लॅन तयार

स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, शिंदे सेना आणि उद्धव सेना या तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या स्तरावर पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीत उमेदवारी न मिळणे, पराभव होणे किंवा ऐनवेळी पक्षाने माघार घेण्यास सांगणे, अशा विविध कारणांमुळे संधी हुकलेल्या अनेकांनी आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिका निवडणुकीत भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाला सर्वाधिक सहा स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी मिळणार आहे. तर शिंदे सेना आणि उद्धव सेना यांना प्रत्येकी दोन जागा मिळणार आहेत. भाजपमधील सहा जागांसाठी प्रदेश नेतृत्वाकडून अंतिम नावे निश्चित केली जाणार असल्याने इच्छुकांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे.

स्वीकृत नगरसेवकपदाची संधी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मिळणार की आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निकवर्तीयांना अथवा नातेवाईकांना प्राधान्य दिले जाणार, याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. आमदारांचे समर्थक आणि निकटवर्तीयी या पदासाठी प्रयत्नशील असल्याने इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, आतापर्यंत एकूण ५४ अर्ज वितरीत करण्यात आले आहेत. त्यापैकी २१ इच्छुकांना महापालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात या पदांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Water Scarcity | नाशिक जिल्ह्यात पाणीबाणीचे गंभीर संकट; 700 गाव-खेड्यांत पाणीबाणी; 900 टँकरने पाणीपुरवठा

ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले २१ इच्छुक
रविंद्र गांगुर्डे, बाबासाहेब गायकवाड, चारूशिला गायकवाड, प्रमोद पाटील, संदीप लेनकर, शरद देवरे, संजय चव्हाण, रामकृष्ण कदम, गिरीश पालवे, मीनल पाटील, जगदीश पाटील, पोपट शिंदे, अमोल जाधव, मंदाकिनी जाधव, महेश महकाळी, चंद्रशेखर पंचाक्षरी, जयप्रकाश घंटे, हेमंत गायकवाड, गौरव बच्छाव, विजय राऊत, अभिजित राऊत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news