देवळाली कॅम्प (नाशिक ) : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात तीन दिवसांपूर्वी नर बिबट्या जेरबंद झाला असताना गुरुवारी (दि.24) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बछडा पिंजऱ्याच जेरबंद झाला. परंतु दोन बछाड्यांची मादी अद्याप मुक्त संचार करत असल्याने परिसरात भीतीचे सावट कायम आहे.
दारणा नदी किनारी बिबट्या सतत मुक्त संचार करीत असल्याने या भागातील नागरिका सतत भितीच्या छायेत आहेत. तीन दिवसांपूर्वी जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात नर बिबट्या जेरबंद झाला होता. मात्र त्याच वेळेस नागरिकांनी अद्याप तीन बिबटे परिसरात मुक्त संचार करीत असल्याचे सांगितले होते. त्या भीतीने पाटोळे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनअधिकाऱ्यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन बुधवारी दुपारी येथे पिंजरा लावला. गुरुवारी पहाटे साडेतीनला बिबट्याचा बछडा भक्ष्यासाठी पिंजर्यात घुसला असता जेरबंद झाला. त्याने फोडलेल्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली. पहाटे याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच वनअधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप, पांडुरंग भांगरे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाली.
दारणा परिसरात बिबट्यासह मादी जेरबंद झाली असली तरी दोन बछड्यांची मादी अद्याप मुक्त संचार करत असल्याने परिसरात भीतीचे संकट कायम आहे. वनविभागाने यातून मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य युवराज जुंद्रे यांनी केली आहे.
बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर त्याने फोडलेल्या डरकाळीने मादी देखील सावध झाली. पहाटे सहाच्या सुमारास मादी पिंजऱ्याजवळ येऊन बछड्याला सोडवण्याचा प्रयत्न करीत होती. त्यासाठी तिने पिंजऱ्यावर जोरजोरात प्रहार देखील केले होते. मात्र नागरिकांच्या आवाजाने मादी निघून गेली.
नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात दोन दिवसांपूर्वी एक नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असला तरी अजूनही मादी एका बछड्यासोबत मुक्त संचार करत असल्याने वनविभागाने या ठिकाणी पुन्हा पिंजरा उभा केला आहे.
दारणा नदी किनारी दोन दिवसांपूर्वी नर बिबट्या जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात जेरबंद करण्यात आला होता. मात्र त्याच वेळेस नागरिकांनी अद्याप बिबट्याची मादी व बछडे मुक्त संचार करीत असल्याचे सांगितले होते. त्या भीतीने पाटोळे यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनअधिकाऱ्यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन बुधवारी (दि.23) दुपारी वनअधिकारी विजयसिंह पाटील व अशोक खानझोडे यांच्या उपस्थितीत जगन्नाथ पाटोळे यांच्या मळ्यात पिंजरा उभा केला.