

देवळाली कॅम्प (नाशिक) : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवेत वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झाला. मात्र अद्यापही या भागात बिबट्यांचा संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण कायम आहे.
लोहशिंगवे या परिसरात बिबट्याची दहशत वाढल्याने वन खात्याने आठ दिवसापूर्वी येथील जगन्नाथ बापुराव पाटोळे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता. पिंजऱ्यातील सावज टिपण्याच्या प्रयत्नात बिबट्या पहाटे अलगद जाळ्यात फसला. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील नागरिक जागे जागे झाले. त्यांनी तातडीने वन अधिकारी यांना बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिली. वनाधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे,अंबादास जगताप यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन पिंजरा ताब्यात घेत तो गंगापूर येथील रोपवाटिकेमध्ये हलवला.
दारणा काठच्या गावांमध्ये बिबट्यांचा वावर नित्याचाच झाला आहे. लहवित, लोहशिंगवे, नाणेगाव, देवळाली कॅम्प, गोडसे मळा, आर्टिलरी सेंटर, गांधीनगर, गवळाने आदी ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.
विजयसिंह पाटील, वनअधिकारी
दारणा काठच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर हा नियमित झालेला आहे. त्यात रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून शेतावर जावे लागते. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत करणे महत्त्वाचे आहे
संतोष जुंद्रे, माजी सरपंच