नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील यूथ फेस्टिव्हल मैदानावरील कृषी कुंभ २०२६ मधील 'शेतकरी जुगाड ते तंत्रज्ञान' या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील रमाकांत बागूल यांनी तयार केलेल्या 'कांदे वाफे खाचे' या यंत्रास प्रथम क्रमांक मिळाला, तर द्वितीय पारितोषिक नाशिक येथील रवींद्र शेवाळे (डाळिंब बागेतील गवत कापणी यंत्र), तृतीय पारितोषिक बापूसाहेब साळुंखे (वाफसा तयार करणारे यंत्र) यांना मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण तुलसीदास बास्टेवाड (संशोधक, राही), अमित पाटील (वरिष्ठ शाखज्ञ, केव्हीके, मालेगाव), नितीन ठोके (वरिष्ठ शास्त्रज्ञ, केव्हीके, नाशिक) यांनी केले. विजेत्यांना व सर्व सहभागी शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद उपस्थित होते. कृषी कुंभला दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी भेट देत नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
तसेच विविध कृषी विषयक प्रात्यक्षिके, कृषी प्रक्रिया व बचत गटाची, वेगवेगळ्या कृषिनिविष्ठांची दालने अशा वैविध्यपूर्ण वाींना प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली. शेतकऱ्यांसाठी कृषी परिसंवाद, शेतकरी पुरस्कार व शेतकरी जुगाड तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकरी परिसंवादात जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष पिकातील नवीन तंत्रज्ञान, नवीन सुधारित वाण, बदलत्या हवामानाच्या दृष्टीने द्राक्ष शेतीत करावयाचे बदल याबाबत सह्याद्री फार्मचे द्राक्ष तज्ज्ञ पंकज नाठे, पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अनंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी परिसंवादानंतर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या २५ शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी शेतकरी
नीलेश पवार, पीक संरक्षण व अंडी उबवणी यंत्र (नाशिक)
संपत चिंचवडे, उसाचे टिपरे मातीआड करण्याचे यंत्र (पुणे)
कांतीलाल पाटील, कीटक सापळे (जळगाव)
राजेश पाटील, स्वस्त जीवामृत तंत्र (नाशिक)
प्रतीक व भाऊराव जगताप, सौरचलित घरगुती हायड्रोपोनिक्स सदाशिव शेळके, चार जातींचे घरगुती डाळ व पीठ यंत्र (नाशिक)
सुरेश घुगे, स्प्रे पंप, प्रतवारी यंत्र व छोटी ट्रॉली (नाशिक)