Nashik Ramkal Path Project | शाहीमार्गालगतच्या घरांवर महापालिकेकडून लाल खुणा

Nashik Ramkal Path Project | नागरिकांच्या मनात विस्थापित होण्याची भीती
Nashik Ramkal Path Project
Nashik Ramkal Path Project
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाकांक्षी रामकाल पथ प्रकल्पासाठी काळाराम मंदिर परिसरातील अनेक घरे, दुकानांवर महापालिकेने हातोडा मारल्यानंतर आता शाहीमार्गावरील गणेशवाडी, जुना आडगाव नाका आणि मुंजोबा चौक या दाट लोकवस्तीच्या भागातील घरांवर महापालिकेने लाल खुणा मारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Nashik Ramkal Path Project
Bus Accident | भाविकांची बस कानपूरजवळ अपघातग्रस्त

रस्ता रुंदीकरणासाठी बाधित घरांवर या लाल खुणा मारण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबं विस्थापित होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किरण पानकर यांनी महापालिकेच्या या कार्यवाहीला विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांना आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी पंचवटीतील गणेशवाडी ते मुंजोबा चौक परिसरात इमारतींवर लाल खुणा करण्यात आल्या आहेत.

Nashik Ramkal Path Project
Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी 'गाइड'

यामुळे शेकडो कुटुंबे आणि व्यावसायिक चिंतेत आहेत. प्रशासनाने रस्ते रुंदीकरणाचा नकाशा जाहीर करावा आणि बाधित होणाऱ्यांना योग्य मोबदल्याचे लेखी आश्वासन द्यावे, याबाबत लवकरच स्थानिक नागरिकांना घेऊन महापौर व आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती पानकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news