Nashik Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी 'गाइड'

Nashik Kumbh Mela 2027 | पर्यटन संचालनालयाकडून स्थानिक युवकांना 'टूर गाइड' प्रशिक्षणाची संधी
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती मिळावी तसेच स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत पर्यटन संचालनालयामार्फत टूर गाइड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Bus Accident | भाविकांची बस कानपूरजवळ अपघातग्रस्त

इच्छुकांनी गुगल लिंकवर सोमवार (दि. १६) दुपारी २ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत यांनी केले आहे. प्रशिक्षणासाठी नाशिक प्रादेशिक विभागातील इच्छुक उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

या प्रशिक्षण उपक्रमाद्वारे प्रसिद्ध पर्यटन स्थळांबाबत पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik MIDC Land Shortage | गुंतवणूक आली मोठी, भूसंपादनाची कासवगती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातील तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देतील. सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थांना पर्यटन संचालनालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल. कुंभमेळा कालावधीत टूर गाइड म्हणून काम करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे.

फिरतीची आवड असलेल्या युवकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेत आपल्या आवडीला करिअरची दिशा द्यावी, असे आवाहन उपसंचालक डॉ. राऊत यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी गुगल लिंकवरून १६ मार्चपर्यंत अर्ज करावा. अर्जाची निवड प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news