Pregnancy Anomaly Scan Pudhari
नाशिक

KIMS Manavata Hospital | आता प्रसूती प्रवास होणार 'स्ट्रेस-फ्री'

KIMS Manavata Hospital | 'किम्स मानवता 'मध्ये अत्याधुनिक एलडीआरपी सूट कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मातृत्वाचा सोहळा अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी नाशिकमधील प्रसिद्ध 'किम्स मानवता हॉस्पिटल'ने मोठे पाऊल उचलले आहे. हॉस्पिटलच्या 'किम्स कल्स' (मदर अॅण्ड चाइल्ड युनिट) मध्ये अत्याधुनिक एलआरडीपी सूटचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सामान्यतः प्रसूतीदरम्यान महिलेला लेबर रूम, लेबर ओटी आणि त्यानंतर वॉर्ड अशा वेगवेगळ्या ठिकाणी हलवावे लागते. त्यामुळे होणारा त्रास आणि ताण टाळण्यासाठी एलआरडीपी ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

यात गरोदर महिलेला कळा येण्यापासून ते प्रसूती, त्यानंतरची सुधारणा आणि बाळासोबतचा सुरुवातीचा काळ या सर्व प्रक्रिया एकाच रूममध्ये पार पडतात. वारंवार स्थलांतर टाळल्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो आणि नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वृद्धिंगत होते. याप्रसंगी बोलताना रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राज नगरकर यांनी भावनिक आणि वैद्यकीय पैलूंवर भर दिला.

ते म्हणाले की, आमच्यासाठी डिलिव्हरीची संख्या महत्त्वाची नसून, आई आणि बाळ सुखरूप घरी जाणे हेच आमचे खरे यश आहे. अत्याधुनिक आयसीयू, एनआयसीयू आणि २४ तास उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांमुळे आम्ही हायरिस्क केसेसदेखील यशस्वीपणे हाताळू शकतो.

स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. प्रणीता संघवी यांनी सांगितले की, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे गरोदर महिलांमध्ये भीती आणि शंका असतात. यावर उपाय म्हणून हॉस्पिटलतर्फे विशेष उपक्रम राबविले जातात. गेल्या वर्षभरात किम्स कल्समध्ये २५० हून अधिक यशस्वी डिलिव्हरी झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT