Jammu and Kashmir 
नाशिक

Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमघ्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षात फूट?

Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील अंतर्गत असंतोष वाढत असून, त्यामुळे पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : अनिल साक्षीड
जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षातील अंतर्गत असंतोष वाढत असून, त्यामुळे पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. खासदार मेहदी रुहुल्ला यांनी ३ नोव्हेंबर रोजी पक्षासह खासदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच ११ असंतुष्ट आमदारांनी बंडाळीचा इशारा दिल्यामुळे पक्ष नेतृत्वामोरील आव्हाने वाढली आहेत.

पक्षातील नाराज नेत्यांना एकत्र ठेवण्यात नेतृत्व अपयशी ठरल्यास संघटनेतील सत्तासंतुलन बिघडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. या असंतोषाचे रूपांतर सामूहिक बंडाळी झाल्यास सरकारची स्थिरता, पक्षाचा जनाधार आणि आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.
भाजपच्या आशा बंडखोरीवर दरम्यान, प्रदेश भाजपचे लक्ष ३ नोव्हेंबरनंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीकडे लागले आहे.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये फूट पडल्यास भाजपसमोर सत्तेच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात. मात्र, केवळ पक्षातील नाराजीमुळे सत्तांतर घडेलच, असे नाही. त्यासाठी विधानसभा पर्याप्त संख्याबळ आणि आमदारांचा स्पष्ट पाठिंबा आवश्यक ठरणार आहे.

सध्या नॅशनल कॉन्फरन्ससमोर बंडखोरी रोखणे आणि नाराज आमदारांचा विश्वास पुन्हा संपादन करणे हे प्रमुख आव्हान आहे. ३ नोव्हेंबर हा पक्षासाठी महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. असंतोष प्रत्यक्ष राजीनामांमध्ये परिवर्तीत होतो की नेतृत्व वेळेची परिस्थिती नियंत्रणात आणते, यावर पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीचे चित्र स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT