नाशिक

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दहा लाखांच्या घरफोडी, जबरी चोरी

गणेश सोनवणे

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; जळगाव जिल्ह्यात अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी व घरफोड्या करुन दहा लाख 52 हजार 189 रुपयाच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. चोपडा शहर, अमळनेर, जळगाव शहर, रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत या चो-या झाल्या. चांदीचे दागिने, टीव्ही, संसार उपयोगी वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी या चारही पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. (Jalgaon Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शरद जिजाबाई भास्कर सोनवणे या शहरातील महादेव हरेश्वर मंदिर परिसरात जात असताना अज्ञात मोटरसायकल वरून मागून दोन अनोळखी इसम मणी गळ्यातील 35 ग्रॅम 970 मिलिग्रॅम सोन्याची पोत त्यात पाच ग्रॅम चे पेंडल असे एक लाख 16 हजार 689 रुपयांची सोन्याची पोत लंपास लंपास केली. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित सावळे हे करीत आहे. (Jalgaon Crime)

अमळनेर शहरातील गट नंबर १३८० प्लॉट नंबर 6 रो हाऊस आर के नगर येथे राहणारे भदू दौलत पाटील दौलत पाटील यांच्या घराच्या दरवाज्याच्या कडी कोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून गोदरेज कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 6 लाख 80 हजार रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्यानी लपास केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहे.

जळगाव शहरातील प्लॉट नंबर ३०४ सुंदरम आपारमेंट दूध फेडरेशन जवळ महावीर नगर येथे राहणारे  हर्षा प्रमोद कुलकर्णी यांच्या घराच्या हरवलेल्या चावीचा गैरफायदा घेऊन दरवाजाचे कुलूप उघडून घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे 2 लाख 32 हजार 500 रुपयांचे ऐवज लंपास केले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे तपास करीत आहे.

रामानंद नगर येथील विजय ज्योत प्लॉट नंबर १८ गट नंबर गट 118/353+354 असावा नगर येथे राहणारे दीपक विजय पाटील हे नोकरीनिमित्त 10 सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून पुन्हा येथे गेले होते, ते पुन्हा जळगाव येथे आले असता दरवाज्याचे मुख्य दरवाज्याचे कुलूप उघडून घरात आल्यावर सर्व सामान अस्तव्यस्त फेकलेले होते. अज्ञात चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरील लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश करून 50 इंची टीव्ही सिलिंग फॅन संसार उपयोगी भांडे असे 23 हजार रुपयांच्या मुद्देमाल घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुशील चौधरी हे तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT