Increase in the number of coaches of Rajya Rani Express
नाशिक : प्रतिनिधी
नांदेड ते मुंबई दरम्यान दररोज धावणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या बोगी संख्येत वाढ करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला खा. राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे. राज्यराणी एक्स्प्रेसला पाच वाढीव बोग्या जोडल्या जाणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
दररोज हजारो प्रवासी राज्यराणी एक्स्प्रेसमधून प्रवास करतात. नाशिक, मनमाड, इगतपुरीसारख्या भागातील नागरिकांसाठी ही रेल्वेगाडी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, मर्यादित डबे आणि प्रचंड प्रवासी संख्येमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात खा. गोडसे यांनी दक्षिण मध्य रेल्वे, भुसावळ विभाग तसेच रेल्वे मुख्यालयाशी पत्रव्यवहार करत हा विषय प्रभावीपणे मांडला. रेल्वे प्रशासनाने डब्यांची संख्या वाढवावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली होती.
त्यानंतर प्रवाशांची वाढती संख्या,अस्वस्थता आणि प्रवासाच्या असुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन राज्यराणी एक्स्प्रेसच्या बोगी संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नाशिकसह जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाला डिशनल डिव्हिजन रेल्वे मॅनेजर (एडीआरएम) भुसावळ विभाग यांचीही मान्यता मिळालेली आहे. लवकरच सुधारित रचना कार्यान्वित होणार आहे.
66 तपोवन, राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या नाशिकच्या जीवनवाहिनी आहेत. मात्र, राजकीय अनास्थेमुळे गेल्या काही दिवसांत या रेल्वेगाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच आहे.राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक