Nashik Zilla Parishad school teacher sexual assault case
इगतपुरी: इगतपुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने चॉकलेटचे अमिष दाखवून ९ वर्षाच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
रामचंद्र मनाजी कचरे (वय ५५) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. कचरे याने पीडित चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि अत्याचार केला. या घटनेने ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.
राज्यातील दोन हजार शाळा पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर असून यातील ६२० शाळा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच अनुषगांने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची आकडेवारी समोर आली असून येथील ९६ शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे. निफाड व येवल्या दोन शाळांमधे प्रत्येकी एक विद्यार्थी शिकत असून कमी पटसंख्येच्या सर्वाधिक शाळा सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व येवल्यात आहेत.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी एकही शाळा बंद होणार नसल्याचे जाहीर केले असले तरी, कमी पटसंख्या असलेल्या या शाळा अडचणीत सापडल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला. अखेर शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय रद्द केला आहे.
शाळांमधील पटसंख्या ही चिंतेचा विषय बनली आहे. जिल्ह्यात स्थितीला दहा पटसंख्या असलेल्या केवळ २६ शाळा आहेत. ९ पट असलेल्या १८ शाळा तर ८ पट असणा-या ९ शाळा आहेत. तीन पटसंख्या असलेली एक शाळा असल्याने ५, ६ व ७ पट असणा-या अनुक्रमे १३, ११ व १२ शाळा जिल्ह्यात असल्याची नोंद शासन दप्तरी दिसून येते.