नाशिक

नाशिकमध्ये तूर्तास झिकाची भीती नसल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी तालुक्यात झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळल्यानंतर नाशिक महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडमध्ये आला असून, तपासणी करताना तूर्त कुठल्याच प्रकारचा धोका नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी माहिती दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका असलेल्या इचलकरंजी शहरात झिका विषाणूचे तीन रुग्ण आढळले. त्यात एका डॉक्टरसह गर्भवती महिलेचा समावेश आहे. त्यामुळे विषाणूचा राज्यभर प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने नाशिक महापालिका हद्दीत झिकाचा कुठल्याच प्रकारचा धोका नाही. झिका विषाणूचा प्रसार डासांपासून होत असल्याने स्वच्छता हाच एकमेव उपाय आहे. ताप येणे, अंग ठणकणे अशा प्रकारची लक्षणे आहेत. लहान मुले व गर्भवती महिलांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT