Nashik Groundwater Level pudhari photo
नाशिक

Nashik Groundwater Level | नाशिक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट; येवला तालुक्यात तीन मीटरपेक्षा अधिक पाणीपातळी खाली

Nashik Groundwater Level | जिल्ह्यातील 13 तालुक्यांना फटका : प्रशासनाकडून पाणी बचतीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात यंदा भूजल पातळीत मोठी घट नोंदविण्यात आली असून, सप्टेंबर २०२६ मधील भूजल पातळीची मागील पाच वर्षांच्या सरासरीशी तुलना केली असता, जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याचे समोर आले आहे.

पैकी येवला तालुक्यात तीन मीटरपेक्षा अधिक, तर चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव आणि सिन्नर या पाच तालुक्यांमध्ये दोन ते तीन मीटरने भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिक आणि शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील बागलाण, इगतपुरी, कळवण, पेठ आणि सुरगाणा या पाच तालुक्यांमध्ये भूजल पातळीत एक ते दोन मीटरने घट झाली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये ही घट एक मीटरपेक्षा कमी आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत भूजल पातळी घसरल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे, यात सर्वाधिक पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीचाही समावेश असल्याने दुष्काळाची दाहकता अधोरेखित झाली आहे. यासोबतच त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या पावसाच्या तालुक्यातही भूजल पातळी घट झालेली असल्याने यावर्षी दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. भूजल पातळीतील घट लक्षात घेता नागरिक, शेतकरी, स्थानिक स्वराज्य

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात चारा छावण्या सुरू होण्याची गरज व्यक्त होत आहे. यापूर्वी जिल्ह्यात येवला तालुक्यात २०१९ मध्ये चारा नियोजनासाठी चारा छावणी तयार झाल्याचे सांगण्यात येते. मात्र यावेळी दुष्काळाची दाहकता तुलनेने अनेक पटीने अधिक असल्याने येवला, मालेगाव, नांदगावसह विविध तालुक्यात शासनाने लवकरात लवकर चाऱ्याचे नियोजन करण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांतून होत आहे.

संस्था आणि विविध संस्थांनी पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात, पाण्याचा पुनर्वापर करावा आणि अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. भविष्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणयाच्या उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकताही जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानानुसार जिल्ह्यात कमी पाण्यावर येणारी पिके तसेच चारा व चारा देणारी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत, यासाठी जनजागरणावरही भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळणावर ठोस उपाययोजना करून त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT