Gold Silver Price Today Pudhari
नाशिक

Gold Silver Price Drop | नाशिकच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण

Gold Silver Price Drop | दसरा - दिवाळीच्या खरेदीसाठी अनुकूल संधी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली. मागील तीन दिवसांत सोने २ हजारारांनी, तर ८ हजारारांनी स्वस्त झाले आहे. चांदी सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी ही घसरण दिलासा देणारी ठरत आहे.

सोने-चांदीच्या दरात झालेल्या नरमाईमुळे खरेदीसाठी बाजारात अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि. १५) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह १ लाख ५० हजार ८९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३८ हजार ८२० रुपये आहे. चांदीचा दर प्रतिकिलो जीएसटीसह २ लाख १७ हजार रुपये नोंद केला गेला.

दसरा आणि दिवाळी हे सोने-चांदीच्या खरेदीच्या दृष्टीने महत्त्वाचे सण मानले जातात. या काळात नवीन दागिनने खरेदी करणे, सोन्यात गुंतवणूक करणे तसेच भेटवस्तू म्हणून चांदीच्या वस्तू घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र, अलीकडील काळात सोने-चांदीचे दर उच्च पातळीवर असल्याने ग्राहक खरेदी करताना सावध भूमिका घेत होते. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून दरात होत असलेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सणासुदीच्या खरेदीचे दिवस जवळ येत असताना, दरातील ही घसरण कायम राहिल्यास सराफ बाजारातील उलाढालीला चालना मिळू शकते. विशेषतः लग्नसराईसाठी दागिन खरेदी करणारे ग्राहक आणि सणासाठी सोने-चांदीच्या वस्तू घेणाऱ्यांसाठी ही परिस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, सोने-चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांच्या व्यवहारानुसार बदलत असतात. त्यामुळे आगामी काळात दरांची दिशा काय राहते, याकडे ग्राहकसह सराफ व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी नोंदविलेले दर

  • २४ कॅरेट सोने – १,५०,८९०रु. प्रति १० ग्रॅम

  • २२ कॅरेट सोने – १,३८,८२०रु. प्रति १० ग्रॅम

  • चांदी – २,१७,०००रु. प्रति किलो

  • (दर जीएसटीसह)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT