Nashik Water Supply Gangapur Dam 
नाशिक

Gangapur Dam | "गंगापूर धरण भरले! टप्प्याटप्प्याने 13,932 क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवला"

Gangapur Dam | गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री झालेल्या पावसामुळे अवघ्या १५ तासांत गंगापूर धरणात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण सुमारे ९७ टक्क्यांपर्यंत भरले असून, पाणलोट क्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस सुरू असल्याने गुरुवारी (दि. २३) सकाळी ६ पासून धरणातून टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्री झालेल्या पावसामुळे अवघ्या १५ तासांत गंगापूर धरणात सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली.

त्यामुळे दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि. २१) ७४.३५ टक्के असलेला साठा गुरुवारी (दि. २३) सुमारे ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे.

या परिस्थितीत रात्रीच्या वेळी अचानक मोठा विसर्ग करणे अडचणीचे असल्याने गुरुवारी दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे गंगापूर धरणात अजूनही २८० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता आहे.

मात्र जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालखेड धरणाचा विसर्ग सकाळी १०,३३२ क्यूसेकवरून दुपारी १२,६८० क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर तो कमी करत ६,६१० क्यूसेक करण्यात आला.

आपत्कालीन स्थितीत परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी खबरदारी म्हणून धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे, यात सकाळी अवघ्या ४९० क्यूसेक असलेला विसर्ग दुपारपर्यंत वाढवत सायंकाळच्या सुमारास १३,९३२ क्यूसेक करण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेळेनिहाय धरणांतून केलेला विसर्ग (क्यूसेकमध्ये)

सकाळी ६ वाजता

  • गंगापूर: ४९०

  • कडवा: १५५४

  • भावली: २८६५

  • पालखेड: १०३३२

  • पुणेगाव: ४५५६

  • होळकर पूल: ५४३३

  • दारणा: २६४८

  • गौतमी गोदावरी: १२२०

  • नांदूरमध्यमेश्वर: १३४०७

सकाळी ९ वाजता

  • गंगापूर: ३१६५

  • कडवा: ३८९२

  • भावली: ३२४७

  • पालखेड: १२६८०

  • पुणेगाव: ८२०१

  • होळकर पूल: ७८३०

  • दारणा: १५४९८

  • गौतमी गोदावरी: ३०००

  • नांदूरमध्यमेश्वर: २५९२५

दुपारी १२ वाजता

  • गंगापूर: ९९४५

  • कडवा: १०९६५

  • भावली: ३२४७

  • पालखेड: १२६८०

  • पुणेगाव: ८२०१

  • होळकर पूल: १२६७१

  • दारणा: १५४९८

  • गौतमी गोदावरी: ३०००

  • नांदूरमध्यमेश्वर: ५५७७८

  • वालदेवी: २४१

दुपारी ३ वाजता

  • गंगापूर: १२६००

  • कडवा: १०९६५

  • भावली: ३२४७

  • पालखेड: ९४३६

  • पुणेगाव: ८२०१

  • होळकर पूल: १७३१९

  • दारणा: १५४९८

  • गौतमी गोदावरी: ३०००

  • नांदूरमध्यमेश्वर: ५५७७८

  • वालदेवी: १५७८

सायं. ६.३० वा.

  • गंगापूर: १३९३२

  • कडवा: १०९६५

  • भावली: ३२४७

  • पालखेड: ६६१०

  • पुणेगाव: ८२०१

  • होळकर पूल: १६१६९

  • दारणा: १५४९८

  • गौतमी गोदावरी: ३०००

  • नांदूरमध्यमेश्वर: ५५७७८

  • वालदेवी: २१७५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT