Chandwad Politics Shirishkumar Kotwal Join BJP
सुनिल थोरे
चांदवड: नाशिक जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी- 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथील भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा होणार असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करतील. या वेळी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कोतवाल यांच्या या निर्णयामुळे चांदवड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, भाजपच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण आहे.