नाशिक

नाशिकमध्ये उद्यापासून पाच दिवस महासंस्कृती महोत्सव, विनाशुल्क मिळणार सांस्कृतिक मेजवानी

गणेश सोनवणे

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने उद्या दि. २८ पासून पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका या ठिकाणी 28 फेब्रुवारी ते 3 मार्च, 2024 कालावधीत होणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवात स्थानिक कलावंतासह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटक यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांना प्रवेश विनामूल्य असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत.

असा आहे पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव

▪️ पहिला दिवस – बुधवार, दि. 28 फेब्रुवारी, 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ते ६ या वेळेत वैशाली प्रोडक्शन प्रस्तुत लेकी जिजाऊंच्या कार्यक्रम, ६ ते ७ वाजता ह. भ. प. निवृत्ती चव्हाण महाराज यांचे कीर्तन व ६ ते १० या वेळेत सागर कारंडे, संदीप गायकवाड, माधवी निमकर, आकांक्षा कदम इतर कलाकार यांच्यातर्फे महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम सादर होणार आहे.

▪️ दुसरा दिवस गुरूवार, दि. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ५ यावेळेत श्यामची आई या नाटकाचे अ. भा. म नाट्य परिषद सादरीकरण करणार आहे. ५ते ६.३० या वेळेत सपान थिएटर्स नाशिक कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण करतील आणि ६.३० ते १० या वेळात नवदुर्गा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

▪️ तिसरा दिवस शुक्रवार, दि. १ मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत नाशिक जिल्हा असोसिएशनच्या वतीने लता मंगेशकर यांना आदरांजली हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर 5 ते 6 या वेळेत मालेगावचे ह. भ. प. श्रावण अहिरे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मैदानी खेळ व दांडपट्टा लाठीकाठी रिंग व लेझिमचे सादरीकरण रुंगाठा हायस्कूलचे पथक करणार आहे. त्यानंतर 7 ते 10 वाजता मराठी नाटक कुरर्र चे सादरीकरण कलाकर विशाखा सुभेदार, पॅडी कांबहै, प्रियदर्शन जाधव व सहकालाकार करणार आहेत.

▪️चौथा दिवस शनिवार दि. 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत गजर हरिनामाचा नृत्य नाटिकेचे सादरीकरण मंडळ कलाकारी आहेच, संस्था नाशिकद्वारे होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 या वेळेत यशवंत व्यायाम शाळेतर्फे मल्लखांब प्रात्यक्षिकांचे होईल. आम्ही महाराष्ट्राच्या लेकी या कार्यक्रम सायंकाळी 6 ते 7 यावेळीत कला स्त्री ग्रुप, नाशिकतर्फे सादर करणार आहे. यानंतर 7 ते 10 या वेळेत संगीतकार मिलींद जोशी, रवींद्र खोमणे (सुर नवा ध्यास नवा विजेता) मृण्मयी फाटक व ओंकार बंडवे हे कलाकार उर्जा बँड गितांचा व नृत्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

▪️ पाचवा दिवस रविवार 3 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळात सनई, संभळ वादन कार्यक्रम, आदिवासी नृत्य, पावरा नृत्य, शेवंती नृत्य, कांबडा नृत्य, लावणी, लोककला अशा विविध लोकप्रकारांचा जुगलबंदी कार्यक्रम होणार असून वासुदेव विश्वास कांबळे व नंदा पुणेकर, नाशिक हे कालाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सायंकाळी 5.30 ते 6.15 या वेळेत नाशिक कवी असोसिएशन तर्फे कवी संमेलन आयोजित केले आहे. आणि पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव 2024 या कार्यक्रमाचा समारोप 6.15 ते 7.15 या वेळेत हाईल. यानंतर सांयकाळी 7.15 ते 10 या वेळेत मी सह्याद्री बोलतो- शिवराज्याशिषेक सोहळा चे सादरीकरण शुवर शॉट इव्हेंट संकल्पना व सादरकर्ते भूषण देसाई करतील.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT