FDA Raid Nashik  
नाशिक

FDA Raid Nashik | नाशिकमध्ये 'एफडीए'ची मोठी कारवाई! रविवार कारंजातून 1.29 लाखांचा संशयास्पद साठा जप्त

FDA Raid Nashik | नाशिककरांच्या आरोग्याशी खेळ? 'एफडीए'कडून मिथ्याछाप खाद्यपदार्थांचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या राज्यव्यापी विशेष मोहिमेंतर्गत रविवार कारंजा येथील मे. विजया एंटरप्रायजेस येथे छापा टाकून सुमारे १ लाख २९ हजार २९८ रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाने मंगळवारी (दि. ८) ही तपासणी केली. अन्नपदार्थ मिथ्याछाप व निकृष्ट दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून २९८.४ किलो वजनाचा १ लाख २९ हजार २९८ किमतीचा साठा जप्त केला.

जप्त केलेल्या पदार्थांच्या लेबलवर 'न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन'मध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी असे नमूद केले होते. परंतु लेबलवर नियमानुसार आवश्यक असणारा 'फोर्टिफिकेशन'चा लोगो आढळला नाही.

जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी ऋतुजा नवले आणि अश्विनी पाटील यांनी सहआयुक्त (अन्न) मंगेश माने व सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT