Dwarka Nashik road 
नाशिक

Dwarka Nashik Road | द्वारका-नाशिकरोड मार्ग वाहनांसाठी खुला

Dwarka Nashik Road | नऊ महिन्यांनंतर वाहतूक सुरू; भाभानगर मार्गावरील कोंडीला मिळणार दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेला द्वारका-नाशिकरोड मार्ग शनिवारी रात्री उशिरा वाहनांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे नाशिकरोडकडे जाणारी वाहतूक भाभानगर काठेगल्ली सिग्नल मार्गावरून वळवण्यात आली होती. या मार्गावरील वाहतूक कोंडीला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मार्ग बंद असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालकांना भाभानगरमार्गे प्रवास करताना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. आता द्वारका-नाशिकरोड मार्ग खुला झाल्याने वाहनचालकांचा वेळ आणि गैरसोय कमी होणार आहे.

दरम्यान, मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक सुरू करण्यात आल्याचे दिसून येते. द्वारकापासून काठेगल्लीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, वडाळा नाका ते द्वारका परिसरातील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका चौकातील कामांना वेग देण्यात आला आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी द्वारका चौकाचे ऑक्टोबरमध्ये पूर्ण खुला करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार कामाला गती आल्याचे चित्र आहे.

वाहतूक कोंडीला तात्पुरता दिलासा

द्वारका-नाशिकरोड मार्ग खुला झाल्याने भाभानगर परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, उर्वरित कामे पूर्ण करून मार्गाची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT