Citilink Bus | नाशिक सिटिलिंक महिला बस वाहक निलंबित; सोशल मीडियावरील व्हिडिओची महामंडळाकडून गंभीर दखल!

Citilink Bus | प्रवाशाशी गैरवर्तनाचा प्रकार; सविस्तर चौकशी सुरू
City Link Nashik
City Link NashikPudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटिलिंक) महिला वाहकाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महामंडळ प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित महिला वाहकास निलंबित केले आहे.

City Link Nashik
Nashik Bazar Samiti | नाशिक बाजार समितीला न्यायालयाचा मोठा दणका; 14 बँक खाती गोठवण्याचे आदेश!

या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असून, चौकशीतून वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. सिटिलिंकच्या सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि जबाबदार पद्धतीने वर्तणूक करणे अपेक्षित आहे.

प्रवाशांना सुरक्षित, दर्जादार आणि नागरिकाभिमुख सेवा देणे ही महामंडळाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, संबंधित महिला वाहकाशी निगडित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत प्राथमिक स्तरावर निलंबनाची कारवाई केली.

City Link Nashik
Adivasi Student Protest | आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी धुळ्यात आमरण उपोषण: पुणे-नाशिक आंदोलनाला पाठिंबा

महामंडळाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांशी गैरवर्तन किंवा सेवाशिस्तीचा भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला समर्थन दिले जाणार नाही. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या तक्रारी आणि घटनांचीही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे.

दरम्यान, प्रवाशांना अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्यांनी संबंधित माहिती महामंडळाच्या अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेकडे सादर करावी, असे आवाहन सिटिलिंक प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news