Dates Pudhari
नाशिक

Nashik DRI | नाशिकमध्ये DRI ची मोठी कारवाई! पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे आलेली 362 टन खारीक जप्त

Nashik DRI | नाशिकमध्ये DRI ची मोठी कारवाई! पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे आलेली 362 टन खारीक जप्त

पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानमधून आलेल्या ३६२ मीट्रिक टनांपेक्षा जास्त खारीकचा साठा नाशिकमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केला आहे. 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट'अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तानी मालाच्या आयातीवर केंद्र सरकारने बंदी घातली असताना छुप्या मार्गाने भारतात माल पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने उधळला आहे.

अर्थ मंत्रालयाने सोमवारी (दि. १४) प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. या मालाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. हा माल आयात करणाऱ्या मुंबईच्या कंपनीची चौकशी करण्यात आली.
मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, डीआरआय अधिकाऱ्यांनी नाशिकमधील अंबड येथील कंटेनर फ्रेट स्टेशनवर मुंबईतील एका कंपनीने आयात केलेले खारीकचे १३ कंटेनर अडवले.

हा माल संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) जेबेल अली बंदरातून आला होता आणि आयात कागदपत्रांवर यूएई हाच मूळ उत्पादक देश असल्याचे घोषित करण्यात आले होते.
या मालाचा मूळ देश 'पाकिस्तान' आहे हे लपवण्यासाठी एका विशेष वाहतूक व्यवस्थेची योजना आखण्यात आली होती.

ही खारीक एका जहाजाद्वारे एका वेगळ्या कंटेनर संचात, पाकिस्तानच्या 'कराची' बंदरातून यूएईच्या 'जेबेल अली' बंदरात पाठवण्यात आली होती. जेबेल अली बंदरावर हा माल पोहोचल्यानंतर एका जहाजातून दुसऱ्या जहाजात हलवण्यात आला. तिथे ही खारीक आणखी एका वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये भरण्यात आली आणि पाकिस्तानी नागरिकांकडून चालवल्या जाणाऱ्या कंपन्यांमार्फत ती भारताकडे पुढील प्रवासासाठी वेगळ्या जहाजावर चढवण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT