नाशिक

धुळे : पिंपळनेरला भिक्षा फेरीने श्रीनाम सप्ताहास प्रारंभ

गणेश सोनवणे

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

श्री खंडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त 195 व्या श्री नामसप्ताह यात्रोत्सवाला भिक्षा फेरीने सुरवात झाली. आज शुक्रवार (दि. 15) पासून होणारा श्री नामसप्ताह यात्रोत्सव 24 सप्टेंबरपर्यंत चालेल. यात 23 सप्टेंबला प्रमुख आकर्षणातील कुस्त्यांची दंगल, 24 ला पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धेने यात्रोत्सवाची सांगता होईल. भाविकांना सहभागाचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अकरावे गुरू योगेश्वर महाराज देशपांडे, कुस्ती समिती व पिंपळनेर ग्रामपंचायतीने केले आहे.

संबधित बातम्या :

संस्थापक सद्गुरू यादवराव महाराजांची 205 वी पुण्यतिथी शुक्रवारी साजरी होईल. पहाटे भूपाळी, काकड आरती, सकाळी आठला, गीतापाठ व पूजा, सकाळी सात ते सायंकाळी सात अखंड नामजप सेवा, सायंकाळी पाचला महिलांचे भजन, सायंकाळी सहाला हरिपाठ, रात्री आठला आरती, रात्री साडेनऊ ते साडेअकरा हरिकिर्तन होईल.

एकोप्याचाही संदेश
समर्थ सद्गुरू श्री खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 21 सप्टेंबरला परंपरेनुसार श्री पांडुरंगाची महापूजा, गादीपूजन, भजनी दिंडीसह पांझरा नदीकिनारी समाधीदर्शन सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. 22 ला पहाटे पाच ते सकाळी सातपर्यंत महाकाकड आरती, रात्री साडेअकरा ते 23 ला सकाळी आठपर्यंत जागरणाची (कत्तलची) रात्र, मध्यरात्री साडेबाराला बाजारपेठेतील जामा मशिदीजवळ मुस्लिम बांधवांकडून पालखीचे स्वागत आणि महाराजांच्या सत्कारातून एकोप्याचा संदेश दिला जाईल.

देशविदेशातून पिंपळनेरला पालखीच्या रात्री ट्रॅक्टरवरील सोंग, वहनाचा भाविक रात्रभर आनंद घेतात. यात्रोत्सवात सहभागी होऊन दर्शनासाठी हमखास येतात. 23 ला सकाळी गोपालकाला व कुस्त्यांची दंगल होईल. त्यात राज्यासह देशातील नामांकित मल्ल सहभाग घेतात. समारोपादिवशी 24 सप्टेंबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत पारंपरिक नृत्य स्पर्धा होईल. ही पर्वणी खानदेशवासीयांनी साधावी, अशी असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT