नाशिक

नाशिकमध्ये दहीहंडीची धूम : गल्लीबोळात होणार गोविंदांचा गजर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील कृष्ण मंदिरांमदध्ये मध्यरात्रीपर्यंत जल्लाेष सुरू होता. प्रसिद्ध मुरलीधर मंदिरासह इतर मंदिरांमध्ये रात्री १२ च्या सुमारास पाळणा हलवित कृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भजनसंध्या, महाप्रसाद, दहींहडी, कीर्तनांचे आयोजन ठिकठिकाणी मंदिरांमध्ये करण्यात आले होते.

कृष्ण जन्माष्टीच्या दुसऱ्या दिवशी रंगतो तो दहीहंडीचा उत्सव.. कृष्णाला आवडणारे पदार्थ पोहे, दूध, दही, लोणी, लाह्या एकत्र करून दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला साजरा केला जातो. आज शहरात विविध ठिकाणी उंच जागी फुलापानांनी सजलेली, काल्याने भरलेली दहीहंडीचे मनोरे गोविंदा पथके एकावर एक थर रचून दहीहंडी फोडली जाते. विविध शाळांमध्ये कृष्ण राधाची वेशभूषा करून चिमुकल्यांनी शाळांमध्ये गोपाळकाला उत्सव साजरा केला. गोकुळ अष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्मदिन साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी दही-काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला करून खाल्ला होता. ही अख्यायिका प्रचलित असल्याने गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा "

SCROLL FOR NEXT