शिक्षणमंत्री दादा भुसे  file photo
नाशिक

Dada Bhuse Statement | जरांगेच्या आरोपांची सखोल वा न्यायालयामार्फत चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करू: मंत्री दादा भुसे

Dada Bhuse Statement | पोलिसांवर विश्वास नसेल, तर न्यायालयामार्फत चौकशी करा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपप्रकरणी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची सखोल चौकशी करावी. पोलिसांवर विश्वास नसेल, तर न्यायालयामार्फत चौकशी करावी, अशा चौकशीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुसे यांनी या प्रकरणावर भाष्य केले.

मंत्री भुसे म्हणाले की, जरांगे-पाटील यांनी हा आरोप तीन वर्षांपूर्वीचा का नाही? आता ही माहिती कोणी दिली, याचाही शोध घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर खुलासा केला असून, एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी असे काही केलेले नाही, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. त्याच विचाराने सरकार काम करत असल्याचे भुसे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले होते. त्या काळात जरांगे-पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू होती. त्यामुळे आता संबंधित क्लिप कशी समोर आली, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणाला शिवसेना-भाजपमधील वादाचे स्वरूप देणे योग्य नस्याचे सांगत, प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक असल्याचे भुसे म्हणाले. जरांगे पाटील यांनी आपले नाव घेतले असेल किंवा आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा उल्लेख केला असेल, तर त्यांनी याबाबत आपल्याला कधीही काही सांगितले नसल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री शिंदे २६ रोजी नाशिक दौऱ्यावर

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २६ तारखेला नाशिक दौऱ्यावर येत असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली. या दौऱ्यात शिंदे हे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. तसेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन सेनेच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याचेही भुसे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT