सीताराम गायकवाड, नगरसेवक प्रवीण जाधव, दिलीप बेळे pudhari photo
नाशिक

Nashik-रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ठेकेदार नमला; पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

Rasta Roko protest aid- नगरसेवक प्रवीण जाधव यांचा रास्ता रोको स्थगित

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : दिंडोरी रोडवरील रस्तेकामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातातील दोन पीडित कुटुंबांना अखेर शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक प्रवीण जाधव यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि त्यांनी दिलेल्या रास्ता रोकोच्या इशाऱ्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने आपली चूक मान्य करत बाधित कुटुंबांना आर्थिक मदत दिली. यामुळे रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची माहिती नगरसेवक प्रवीण जाधव यांनी दिली.

संबंधित कंत्राटदार कंपनीने सुरुवातीला आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. सध्या परिसरात एमएनजीएल व इतर कंपन्यांचीही कामे सुरू असल्यामुळे आमच्या कामामुळेच अपघात झाला नसल्याची भूमिका कंपनीने घेतली होती. मात्र, नगरसेवक प्रवीण जाधव यांनी घटनास्थळ, रस्त्यावरील धोकादायक खड्डे आणि युटिलिटीची कामे कंत्राटदाराचीच असल्याचे पुराव्यासह लक्षात आणून दिले. दोषी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कुटुंबांना तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रवीण जाधव यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

जाधव यांच्या या आक्रमक भूमिकेसमोर कंत्राटदार कंपनीने नमते घेत पीडित कुटुंबांना मदत देण्याची तयारी दर्शवली. मदतीचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शी ठेवण्यासाठी नगरसेवक प्रवीण जाधव यांनी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बेळे, गायकवाड़ कुटुंब आणि कंत्राटदार यांच्यात बेट आमनेसामने बोलणे करून देत पारदर्शक पद्धतीने हा मदतनिधी मिळवून दिला.

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उज्वला गायकवाड यांचे पती रात्री वेटरचे काम करतात. ही चूटी झाल्यानंतर मध्यरात्री ते शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन सकाळी सहापर्यंत भाजीविक्रेत्यांना विकून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मध्यरात्री पत्नीसह ते भाजीपाला खरेदीसाठी जात असतानाच त्यांच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक बसून उज्ज्वला गायकवाड यांच्यावर काळाने झडप घातली.

दीपाली बेळेंचे कुटुंब अडचणीत

दुसऱ्या अपघातात, साईनगर येथील दीपाली दिलीप बैळे यांच्या मेंदू‌ला गंभीर मार लागल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना सुरुवातीला 'नाइन प्लस' रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा अवाढव्य खर्च परवडत नसल्याने बेळे यांचे पती पुण्यात टेल्को कंपनीतून निवृत्त झाले आहे. सध्या पेन्शनवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. हे दोन्ही परिवार सामान्य पार्श्वभूमीचे असल्याने कंत्राटदाराकडून मिळालेली ही मदत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

मला दोन मुली व एक मुलगाअसून, एक मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. मात्र, हा अपघात आमच्यासाठी वेदनादायी आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच प्रवीण जाधव यांनी आम्हाला साथ दिली आणि त्यांच्यामुळे मदत मिळाली.

- सीताराम गायकवाड, पीडित

माझी पत्नी कोमात असून, मला तीन मुली आहेत. त्यांचा विवाह झाल्यामुळे आम्ही दोघेच राहतो. या घटनेनंतर आमच्यासाठी सर्व काही बदलेले आहे. माझ्या पत्नीचा अपघात झाला तेव्हाच प्रवीण जाधव यांनी आम्हाला भेट दिली. त्यांनी महासभेत आवाज उठवला. तसेच मदतीसाठी पुढाकार घेतला.

- दिलीप बेळे, पीडित

शिवसेना म्हणून लोकांच्या सुख-दुःखात राहण्याची सवय आहे. आम्ही लोकांच्या प्रश्नावर कायम रस्त्यावर राहू. ही मदत पीडित कुटुंबाला मिळाली यात समाधान आहे.

- प्रवीण जाधव, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT