CM Devendra Fadnavis (File photo)
नाशिक

CM Devendra Fadnavis | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर!

CM Devendra Fadnavis | सिंहस्थ कामांच्या प्रत्यक्ष पाहणीसह यंत्रणांची घेणार झाडाझडती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला अवघे काही आठवडे शिल्लक असताना गोदाकाठावरील कामांना अपेक्षित वेग मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सिंहस्थाच्या तयारीत थेट लक्ष घातले आहे. मुख्यमंत्री फडणवीस येत्या रविवारी (दि. ११) नाशिकमध्ये दाखल होणार असून, सिंहस्थाच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच संबंधित यंत्रणांकडून कामांचा आढावा घेणार आहेत.

नाशिकनाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी हजारो कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणी कामांची गति, नियोजन आणि वेळेत पूर्तता यावरून प्रश्न उपस्थित होत आहेत. नाशिक महापालिका हद्दीतही मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून, त्यांचा वेग वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा रविवारचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रशासनाची कसोटी:

सिंहस्थ महाकुंभाच्या औपचारिक प्रारंभाचा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ध्वजारोहण करण्याचे नियोजन असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची तयारी ही प्रशासनासाठी प्रतिष्ठेची बाब ठरणार आहे.

'फीडबॅक'नंतर मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप?:

सिंहस्थाच्या तयारीबाबत विविध स्तरांतून मिळणाऱ्या अभिप्रायानंतर मुख्यमंत्री कार्याल्याने कामांवर अधिक थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. येथून सिंहस्थाच्या कामांचा नियमित आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT