Chhagan Bhujbal's criticism of Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील यांच्या मुस्लिम आरक्षण विधानावरुन भुजबळांनी त्यांच्यावर टीका केली.  File Photo
नाशिक

Chhagan Bhujbal | जरांगेंचा अभ्यास कमी, मुस्लिम आरक्षणावरुन भुजबळांचा टोला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक पुढारी वृत्तसेवा : राज्यात ओबीसी आरक्षणावरुन जरांगे भुजबळ वाद सुरु असतानाच मनोज जरांगे यांनी काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. यावर मंत्री भुजब‌ळ यांनी, मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीमधून आरक्षण देण्यात आले आहे. जरांगेंचा अभ्यास कच्चा आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगरांना खुश करण्यासाठी ते असे विधान करत असल्याची टिका मंत्री छगन भुजब‌ळ यांनी केली आहे.

काय म्हणाले भुजबळ?

  • भुजबळ म्हणाले जरांगेंचा अभ्यास कमी आहे.

  • मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी जरांगे यांचे विधान.

  • मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीमधून आरक्षण देण्यात आले आहे.

जरागेंनी अभ्यास वाढवावा

गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी मराठा आरक्षण वाद राज्यात सुरु आहे. यावर मनोज जरांगे यांनी ज्यांच्या कुणबी नोंंदी सापडल्या अशा सर्वांना आरक्षण द्यावे अशी मागणी केली. त्यातच दोन दिवसांपुर्वी मुस्लिम समाजाच्या जरी कुणबी नोंदी सापडल्या तर त्यांना देखील आरक्षण देण्यात यावे या मागणीचा समावेश होता. त्या बाबत मंत्री आणि ओबीसी नेते भुजबळ यांनी जरांगेंचा अभ्यास कमी आहे. समाजाला खुश करण्यासाठी ते असे काही ना काही स्टेटमेंट करत असतात. मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसींमधून आरक्षण देण्यात आले आहे. याबाबत त्यांनी अभ्यास वाढवावा असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे.

अद्याप दमडी देखील नाही

राज्यातील आमदारांना भरघोस निधी मिळणार अशा चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या मात्र लोकसभेची निवडणूक असल्याने आचारसंहिता सुरु झाली. त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरु आहे. भरघोस निधी काय अद्याप दमडी देखील मिळाली नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.

शिक्षकांकडून अपेक्षित नाही

शिक्षक मतदारसंघ निव़डणूकीमध्ये पैठण्या, नथ, सफारी यांचे वाटप होत असल्याचे वर्तमानपत्रातून समजले आहे. असे जर होत असेल तर ते योग्य नाही. शिक्षकांकडून या गोष्टी अपेक्षित नसल्याचे मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT