नाशिक

Chess Championship : नंदुरबारच्या सात वर्षाच्या नारायणीने पटकावले सुवर्णपदक

गणेश सोनवणे

 नंदुरबार  : पुढारी वृत्तसेवा

कोलकता येथे सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत (Chess Championship) महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतांना नंदुरबारच्या नारायणी उमेश मराठे हिने सुवर्णपदक पटकावले. तसेच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघात तिने तिचे स्थान निश्चित केले.

भारत सरकार तर्फे तीला आशिया खंडात आणि जागतिक पातळीवर खेळायची संधी मिळते आहे. आता ती आशिया खंडात आणि जागतिक पातळीवर भारताचा तिरंगा ध्वज नक्कीच फडकवेल.

संबधित बातम्या :

ध्येयपूर्तीची जिद्द..
वयाच्या ४ थ्या वर्षी बुद्धिबळाचे धडे गिरवायला सुरू केलेल्या नारायणीने मागील तीन वर्षात खडतर प्रवास केला आहे. एवढ्या लहान वयात वेळेचे योग्य नियोजन करत नियमित प्रशिक्षण, खेळाचा सराव आणि त्याच सोबत नियमित स्पर्धा खेळत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मागील वर्षी ह्याच स्पर्धेत फायनलला पराभूत झाल्यामुळे तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते आणि संघात निवड न झाल्याने पुन्हा जिद्दीने वर्षभर सराव करत ह्या वर्षी तिने चमकदार कामगिरी केली व आज ती भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.

पालकांची मेहनत
रेल्वेत वर्ग चार कर्मचारी असलेले तिचे वडील उमेश मराठे आणि आई अश्विनी मराठे ह्यांनी घरात बुद्धिबळ खेळासाठी पोषक वातावरण तयार करून नारायणी च्या स्वप्नांना बळ दिले. वडिलांनी संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर देखील तिच्या सोबत तीन-तीन तास क्लासेससाठी वेळ काढून तिचे प्रशिक्षण आणि घरी सराव स्वतः करवून घेतला आहे. मुलीच्या आवडीच्या क्षेत्रात तिला बळ देतांना त्यांना स्वतःच्या कितीतरी गोष्टीचा त्याग करावा लागला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT