Chandwad Railway Suicide  
नाशिक

Chandwad Crime News | चांदवडमध्ये खळबळ! 4 वर्षांच्या चिमुरड्याला कडेवर घेऊन बापाची रेल्वेखाली उडी; येवल्यातील घटनेने खळबळ

Chandwad Railway Suicide | धुळगाववर शोककळा! वडिलांनी ४ वर्षांच्या मुलासह संपवले जीवन; रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली धक्कादायक घटना

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

धुळगाव (ता. येवला) येथील वाल्मीक दौलत गायकवाड (४०) यांनी चार वर्षाच्या चिमुकल्या राजेशसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. २८) सायंकाळी तळेगावरोही (ता. चांदवड) येथील रेल्वे क्रॉसिंगलगत घडली.

या घटनेने धुळगावसह परिसर शोककळा पसरली. या घटनेबाबत पोलिसपाटील अविनाश अहिरे यांनी चांदवड पोलिस ठाण्यात माहिती दिली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धुळगाव येथील वाल्मीक गायकवाड यांचे कृषी व रासायनिक खतविक्रीचे दुकान होते. त्यांनी शून्यातून व्यवसाय उभा केला होता.

वाल्मीक गायकवाड हे त्यांचा चार वर्षाचा मुलगा राजेश सोबत तळेगावरोही शिवारातील मध्य रेल्वे लाइनवर येत रेल्वेखाली मुलासह उडी घेत आत्महत्या केली. पोलिस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार आर. पी. गायकवाड यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. गायकवाड यांनी आत्महत्या का केली यांचे कारण समजले नसून पुढील तपास पोलिस करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT