Cervical Cancer Awareness Pudhari File Photo
नाशिक

Cervical Cancer Awareness | भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिकः डॉ. अजय जाधव

Cervical Cancer Awareness | सध्या कमी वयातच महिला आणि पुरुष वर्गाला भयानक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातीलच एक मुख्य आणि गंभीर आजार म्हणजे कॅन्सर.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या कमी वयातच महिला आणि पुरुष वर्गाला भयानक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातीलच एक मुख्य आणि गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. महिलांमध्येदेखील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सायकल कॅन्सर हा स्त्रियांमधील सर्विक्स या अवयवात होणारा कॅन्सर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. भारतीय महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हयकल कॅन्सर) चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रतिपादन नारायणी हॉस्पिटलचे कॅन्सर विकार तज्ज्ञ डॉ. अजय जाधव यांनी केले.

'कॅन्सर डे'निमित्त नारायणी हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले की, सव्र्हायकल कॅन्सर हा प्रामुख्याने 'ह्युमन पॅपीलोमा व्हायरस' या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.

जो योनी, तोंडी किंवा गुदद्वार संभोगाद्वारे एखाद्या व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरू शकतो. याचे प्रमाण ३५ ते ५५ वयाच्या महिलांमध्ये जास्त आढळून येते. यासह काही इतर घटकदेखील याला कारणीभूत आहेत. सुरुवातीला गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे लक्षात येत नाहीत.

गर्भाशयाचा कर्करोग जसजसा वाढत जातो, तशी त्याची लक्षणं निदर्शनास येतात. यामध्ये मुख्यत्वे करून पाळीदरम्यान किंवा लैंगिक संभोगानंतर अनियमित किंवा असामान्य योनी रक्तस्राव, रजोनिवृत्तीनंतर असामान्य योनी रक्तस्राव पाठीच्या खाली वेदना किंवा पायात वेदना, दुर्गंधी स्राव किंवा योनी अस्वस्थता याचा समावेश आहे.

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारत सरकारने अलीकडेच जाहीर केले की, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जी 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस'चा धोका कमी करण्यास मदत करेल. शस्त्रक्रिया किंवा रेडिएशनद्वारे या आजारावर उपचार केले जातात, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT