Malegaon Mayor Election 2026 | मालेगाव महापौरपदी नसरीनबानो शेख

Malegaon Mayor Election 2026 | उपमहापौरपदी समाजवादीच्या शान-ए-हिंद, भाजप व एमआयएमचे नगरसेवक तटस्थ
Malegaon Mayor Election
Malegaon Mayor Election
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत इस्लाम पक्ष व समाजवादी पक्षाने बाजी मारत सत्तेवर आपली पकड मजबूत केली. महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसरीनबानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पक्षाच्या शान-ए-हिंद यांची निवड झाली.

Malegaon Mayor Election
Nashik Waste Management | नाशिक मनपाची कचरा व्यवस्थापनात मोठी झेप; नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले

तथा महापालिकेतील महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी (दि.७) जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रक्रियेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिका परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महापौरपदासाठी एकूण पाच नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. छाननीअंती इस्लाम पार्टीच्या शेख नसरीनबानो खालिद, शेख ताहेरा शेख रशीद आणि शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचे अर्ज वैध ठरले होते.

अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या कालावधीत ताहेरा शेख रशीद यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नसरीनबानो शेख व लता घोडके यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतर झालेल्या मतदानात नसरीनबानो शेख यांना ४३, तर शिवसेनेच्या लता घोडके यांना १८ मते मिळाली. त्यामुळे नसरीनबानो शेख यांनी २५ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला.

उपमहापौरपदासाठी ५ उमेदवारांनी ८ अर्ज केले होते. छाननीनंतर समाजवादी पक्षाचे मुस्तकीम मोहम्मद मुस्तफा, शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे आणि एमआयएमचे हाफिज अब्दुल्ला यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर समाजवादी पार्टीचे शान-ए- हिंद आणि शिवसेनेचे अॅड. नीलेश काकडे यांच्यात थेट लढत झाली.

अंतिम मतदानात शान-ए-हिंद यांना ४३, तर नीलेश काकडे यांना १८ मते मिळाली. शिवसेनेचे काकडे यांचा २५ मतांनी पराभव केला. या दोन्ही निवडणुकीत एमआयएमचे २१ व भाजपचे दोन्ही नगरसेवक तटस्थ राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काम पाहिले. यावेळी आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव, नगरसचिव

हिरव्या व भगव्या फेट्यांची शहरात चर्चा

निवडणुकीपूर्वी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी व काँग्रेसचे नगरसेवक लक्झरी बसमधून एकत्रितपणे महापालिकेत दाखल झाले होते. इस्लाम पार्टीच्या महिला नगरसेविकांनी काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, तर पुरुष नगरसेवकांनीही हिरवे फेटे, समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांनी लाल फेटे व काँग्रेस नगरसेवकांनी पांढरे फेटे परिधान केले होते. शिवसेना नगरसेवक भगवे फेटे परिधान करून सभागृहात आले होते. या दृश्यांची शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

Malegaon Mayor Election
Nashik Mayor Election | सून महापौर झाल्याने नानेगावात जल्लोष

अल्पसंख्याक समाजातून आलो असून, आम्ही शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार आहोत. मालेगाव शहराचा चेहरा बदलणार असून, सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा पुर-वणार आहोत. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर पूर्णपणे उतरणार आहोत. -

शान-ए-हिंद, उपमहापौर

गेल्या वर्षभरापासून शहरात जन्म दाखल्यांच्या नावाखाली गोर-गरीब जनतेची पिळवणूक सुरू आहे. त्या सर्व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार आहे. याशिवाय आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधांसह शहर स्वच्छतेला अधिकाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. शहराचा पूर्व आणि पश्चिम भाग असा भेदाभेद न करता विकासकामे केली जातील. महापौरपदाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार.

- नसरीन शेख, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news