Sanjay Shirsat : माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली  Pudhari News Network
नाशिक

Nashik IT Sexual Harassment Case| आयटी लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठे रॅकेट?

Nashik IT Sexual Harassment Case| मंत्री शिरसाट यांचा संशय; आरोपींना मकोका लावण्याचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील आयटी कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार प्रकरण अत्यंत गंभीर असून, हे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. या प्रकरणात मुलींना छेडछाड, जबरदस्तीने लग्न व धर्मांतराच्या बाबींचाही संशय व्यक्त करण्यात आल्याने सरकारने याची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे.

काही आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणामागे कोणती साखळी किंवा रॅकेट आहे का, याचा शोध सुरू असल्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. - एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक - अत्याचार प्रकरणावर भाष्य केले. कंपनी - व्यवस्थापनाने अशा घटनांकडे दुर्लक्ष करू नये, असे सांगताना शिरसाट यांनी काही प्रकरणांत तरुण, सुशिक्षित व्यक्तींचा गैरवापर करून गुन्हेगारी कृत्ये या घडवून आणली जात असल्याचे नमूद केले. या नी प्रकरणात कठोर कारवाई होण्याची शक्यता असून, या मकोका तसेच पोक्सो सारख्या कठोर कायद्यांचा क विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते, असे नमूद करत ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. इतर मुद्यांवरही भाष्य संभाजीनगरमधील महिला हत्या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामती संदर्भात बोलताना राजकारण बाजूला ठेवून सामाजिक संवेदनशीलता जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, १३ एप्रिल रोजी शिवाजी पार्क येथे २००० ड्रोनच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाचे दर्शन घडविणारा विशेष शो आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ऑपरेशन टायगरसंदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

खरात प्रकरणात चिखलफेक टाळा

अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना शिरसाट यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून तपास कमकुवत करू नये, असे आवाहन करत या प्रकरणात मोठ्या व्यक्ती, अधिकारी व व्यापाऱ्यांची नावे पुढे येत असल्याने सखोल तपासासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले. दोषींना कुणालाही वाचवले जाणार नाही, ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला पाठिंबा

पक्षातील फेरबदल आणि मंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिरसाट म्हणाले की, पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व निर्णयाधिकार आहेत. कोणाला पद द्यायचे, बदल करायचे किंवा निवडणुकीचे निर्णय घ्यायचे हे त्यांच्यावर अवलंबून असून, त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील. दीपक केसरकर यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना त्यांनी सर्वांनी संयम बाळगावा व माहिती संबंधित यंत्रणांकडे द्यावी, असे सांगितले. आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी तपासाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT