Pudhari File Photo
नाशिक

Nashik Bafna Jewellers | सराफ व्यावसायिक नीलेश बाफणा याला अटक

Nashik Bafna Jewellers | टीजेएसबी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सराफा व्यवसाय क्षेत्राला हादरा देणाऱ्या ३८ कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश सुभाष बाफणा यांना अटक करण्यात आली आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि. २६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बहुचर्चित प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दुकानात अवघा २५ लाख रुपयांचा माल असताना तब्बल ५९.०७ कोटी रुपयांचा स्टॉक असल्याचे बनावट विवरणपत्र सादर करीत टीजेएसबी सहकारी बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीजेएसबी सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुहास विजय दंडवते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश बाफणा, सुभाष लखीचंद बाफणा, नम्रता नीलेश बाफणा, प्रभावती सुभाष बाफणा तसेच जामीनदार कांतिलाल लखीचंद बाफणा व सरला पारसमल बाफणा यांनी संगनमत करीत बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, बाफणा ज्वेलर्सने १९९८ मध्ये सुरुवातीला २० लाख रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी कर्जमर्यादा वाढवित ती तब्बल ४४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. कर्जासाठी दुकानातील सोने, चांदी, हिरे आणि व्यवसायातील येणी तारण ठेवण्यात आली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या ऑडिटमध्ये ५४.४८ कोटी रुपयांचा माल आणि २.०७ कोटी रुपयांची व्यापारी येणी असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, मार्च २०२५ पासून कर्जावरील व्याज भरणे थांबल्यानंतर बँकेने वसुली प्रक्रिया सुरू केली.

कर्ज खाते एनपीए घोषित केल्यानंतर सरफेसी कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर बँकेने प्रत्यक्ष स्टॉक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. ३० एप्रिल रोजी बाफणा ज्वेलर्सकडून सादर करण्यात आलेल्या स्टॉक स्टेटमेंटमध्ये दुकानात ५९ कोटी ७ लाख २४ हजार ८४४ रुपयांचा माल असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालय नियुक्त आयुक्त, पंच आणि मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकानाचा ताबा घेऊन तपासणी करण्यात आली असता, धक्कादायक वास्तव समोर आले.

दुकानात सोने अथवा हिरे आढळले नाहीत. केवळ चांदीचे दागिने मिळून आले. त्याचे मूल्य २५ लाख १९ हजार २५० रुपये इतके असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खोटे व बनावट स्टॉक स्टेटमेंट तयार करून बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा संशय बळावला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, तारण मालमत्ता, ऑडिट अहवाल आणि कथित बनावट स्टॉक स्टेटमेंटची छाननी केली जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मार्च २०२५ पासून कर्जावरील व्याज भरणे थांबल्यानंतर बँकेने वसुली प्रक्रिया सुरू केली. कर्ज खाते एनपीए घोषित केल्यानंतर सरफेसी कायद्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर बँकेने प्रत्यक्ष स्टॉक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता.

३० एप्रिल रोजी बाफणा ज्वेलर्सकडून सादर करण्यात आलेल्या स्टॉक स्टेटमेंटमध्ये दुकानात ५९ कोटी ७ लाख २४ हजार ८४४ रुपयांचा माल असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, न्यायालय नियुक्त आयुक्त, पंच आणि मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकानाचा ताबा घेऊन तपासणी करण्यात आली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. दुकानात सोने अथवा हिरे आढळले नाहीत. केवळ चांदीचे दागिने मिळून आले. त्याचे मूल्य २५ लाख १९ हजार २५० रुपये इतके असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे खोटे व बनावट स्टॉक स्टेटमेंट तयार करून बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतल्याचा संशय बळावला.

या प्रकरणी सरकारवाडा

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. तपासादरम्यान आर्थिक व्यवहार, तारण मालमत्ता, ऑडिट अहवाल आणि कथित बनावट स्टॉक स्टेटमेंटची छाननी केली जात आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT