Simhastha Kumbh Mela : सिंहस्थासाठी ३,०५६ कोटींच्या कामांना प्राधिकरणाकडून चालना  Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थासाठी ३,०५६ कोटींच्या कामांना प्राधिकरणाकडून चालना

मार्च २०२६ पर्यंत कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

Authority promotes works worth Rs 3,056 crore for Simhastha

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत खडखडाट वंध सिंहस्थाचे झालेल्या राज्य शासनाने सिंहस्थ निधीसाठी मात्र हात आखडता घेतला असून, सद्यस्थितीत मंजूर झालेल्या १ हजार कोटींच्या तिप्पट अर्थात ३०५६ कोटींच्या सिंहस्थ कामांना कुंभमेळा प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला आहे. मार्च २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व विभागांना दिले आहेत. सिंहस्थासाठी पहिल्या टप्प्यात २३६८ कोटींची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या पदरात जेमतेम १२०० कोटींची कामे पडू शकली आहेत.

नाशिकमध्ये येत्या २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. आता सिंहस्थासाठी दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिल्याने सिंहस्थ कामांना मात्र सुरुवात होऊ शकलेली नाही. सिंहस्थ कामांसाठी महापालिकेने १५ हजार कोटींचा, तर अन्य यंत्रणांचा मिळून एकूण २४ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून जेमतेम एक हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीतून सिंहस्थ कामे हाती घेताना शासकीय यंत्रणांची दमछाक होत आहे. आता सिंहस्थ प्राधिकरणाने बैठक घेत साधारणतः तिप्पट खर्चाचे नियोजन केले आहे. त्यानुसार ३०५६ कोटींच्या कामांना चालना दिली गेली आहे. पहिल्या टप्प्याच्या कामांना दीड वर्ष लागणार आहे, अशा ५१४० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली असून, डिसेंबरअखेर १००४ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. मार्च २०२६ पर्यंत ३०५६ कोटींची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेचा आराखडा असा

मुकणे पाणीपुरवठा योजना: १२५ कोटी, रस्ते: ३६० कोटी, पूल : २५ कोटी ऑप्टिकल फायबर केबल ६० कोटी, मलनिस्सारण : ६६६ कोटी साधुग्राम भूसंपादन : १०५० कोटी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ : १५ कोटी जलकुंभ : २ कोटी, अग्निशमन: ५ कोटी, एकूण महापालिका : ३२७७ कोटी, मंजूर : १२०० कोटी.

जलसंपदा विभाग घाट व बंधारे

२४४ कोटी मंजूर : ३६ कोटी त्र्यंबकेश्वर घाट बंधारे : ११५ कोटीपैकी मंजूर १७ कोटी त्र्यंबकेश्वर वॉटर ग्रीड : २८१ कोटीपैकी मंजूर ११३ कोटी त्र्यंबक वाढीव पाणीपुरवठा : ६४ कोटीपैकी मंजूर १६ कोटी त्र्यंबकेश्वर काँक्रीट रस्ते : ८२ कोटींपैकी मंजूर : २७ कोटी घनकचरा व्यवस्थापन केंद्र : १६ कोटींपैकी मंजूर : ५ कोटी त्र्यंबकेश्वर नगरपालिका : १८२ कोटींपैकी मंजूरः ९० कोटी परिवहन महामंडळ : ९० कोटींपैकी मंजूर : ७७ कोटी राज्य पुरातत्त्व विभाग : १४१ कोटींपैकी मंजूर : ४४ कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी : ७३ कोटी पूर्ण मंजूर नाशिक शहर पोलिस : २० कोटींपैकी मंजूर : ७ कोटी कुंभमेळा कार्यालयीन व इतर खर्च : १२ कोटी

सद्यस्थितीत निधीनुसार प्राधान्याने करण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे एप्रिल २०२७पर्यंत पूर्ण न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल.
- डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष, कुंभमेळा प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT