Smart Parking : स्मार्ट पार्किंग योजनेला अखेर चालना, निविदा उघडणार, पार्किंगचे दर निश्चित

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट पार्किंग योजनेला विधी विभागाने हिरवा कंदील दर्शवल्यानंतर महापालिकेने निविदा उघडण्याची तयारी सुरू केली आहे.
Nashik Smart Parking
Smart Parking : स्मार्ट पार्किंग योजनेला अखेर चालना, निविदा उघडणार, पार्किंगचे दर निश्चित File Photo
Published on
Updated on

Smart parking scheme finally launched, tenders to be opened, parking rates fixed

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट पार्किंग योजनेला विधी विभागाने हिरवा कंदील दर्शवल्यानंतर महापालिकेने निविदा उघडण्याची तयारी सुरू केली आहे. २२ ऑनस्ट्रीट आणि सहा ऑर्फस्ट्रीट पार्किंगचे दरही निश्चित केले असून, दुचाकीसाठी प्रतितास १० ते ६० रुपये, तर चारचाकीसाठी २० ते १०० रुपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. अनधिकृत पार्किंगमध्ये पाहने लावल्यावर टोइंगसाठी मात्र आता जबर दंड आकारण्यात येणार आहे. दुचाकीसाठी सातसे, तर चारचाकीसाठी ११५० रुपये मोजावे लागणार आहेत.

Nashik Smart Parking
Panic Button : कारागृहात संकटसमयी आता 'पॅनिक बटन'

शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरात २९ ऑनस्ट्रीट आणि पाच ऑफस्ट्रीट अशा ३४ पार्किंग स्पॉटला मंजुरी दिली होती. परंतु, कोरोना काळातच हा प्रयोग फसला, आता आयुक्त मनीषा खत्री यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला असून, पार्किंग योजनेला चाल दिली आहे.

शहरात २८ ठिकाणी एकाच वेळी सुमारे ४,८६५ वाहने पार्क करण्याची व्यवस्था निर्माण होणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली गेली आहे. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या जुन्या ठेकेदाराने पुन्हा जिल्हा न्यायालयात धाव घेत त्यास स्थगिती मिळवली होती, न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगिती दिली होती. चार ऑगस्टला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने फोणतेही आदेश दिले नाहीत, त्यामुळे या निविदेला स्थगिती नसल्याचा अभिप्राय विधी विभागाने दिला आहे. त्यानंतर वाहतूक विभागाने स्मार्ट पार्किंगगच्या निविदा उघडण्याची तयारी केली आहे.

Nashik Smart Parking
हृदयद्रावक ! घोटीत धावत्या रेल्वेखाली दाम्पत्यानं जीवन संपवलं

महापालिका, पोलिस प्रशासनाला महसूल

या पार्किंग योजनेतून महापालिका आणि पोलिस प्रशासनाला महसूल मिळणार आहे. पार्किंगमधून महापालिकेला दरमहा ३५ लाख रुपयांचे शुल्क ठेकेदाराकडून मिळणार आहे. तर पोलिसांना टोईगच्या रकमेतून ठेकेदारांकडून शुल्क मिळणार आहे. सोबतच टोइंगसाठीच्या शासकीय दरात दुचाकी, चारचाकी वाढ करण्यात आली असून, कमीत कमी सातले आणि जास्तीत जास्त ११५० रुपये आकारले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news