Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Nashik Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला! 8 एप्रिलपर्यंत पोलीस पाहुणचार; नव्या गुन्ह्यात अटक

Nashik Ashok Kharat Case | लैंगिक शोषण प्रकरणी पोलिस करणार तपास

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण व फसवणुकीचे गंभीर आरोप असलेला भोंदू अशोक खरात याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नाशिक न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी १ एप्रिलला त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. मात्र, नव्या गुन्ह्यात अटक दाखल झाल्याने त्याला पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

गुरुवारी (दि. २) त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता स्क्रीनवरूनच हजर करण्यात आले. न्यायालयात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर गुलाबी टी-शर्ट, वाढलेली दाढी आणि शांत उभा असलेला खरात दिसत होता.

न्यायाधीश बी. एन. इंचपुराणी यांनी त्याचे नाव विचारले असता त्याने सौम्य आवाजात उत्तर दिले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या कृत्यांचा तपशील मांडत गंभीर आरोप केले. आरोपीने आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर तिला औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे.

खरातच्या कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद

खरातला पोलिस कोठडी देण्यासाठी सरकारी वकील अॅड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सविस्तर आणि ठोस युक्तिवाद मांडला. त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२६ दरम्यान आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले असून, गुन्ह्याचा तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.

आरोपीने धार्मिक विधीच्या नावाखाली पीडितेला धमकावून शारीरिक संबंध ठेवले व गर्भपातासाठी अज्ञात गोळ्या दिल्याचा आरोप आहे. तसेच 'जडीबुटी'च्या नावाखाली दिलेल्या औषधांचा स्रोत, पीडितेकडून घेतलेली आधार व पॅनकार्ड कागदपत्रे, मंतरलेले पाणी व त्यातील घटक, तसेच इतर संभाव्य साथीदारांची भूमिका यांचा तपास आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT