

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
उन्हाळी सुट्ट्या आणि गुड फ्रायडे व इस्टर सणानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मडगाव ते बेंगळुरू आणि मडगाव ते मुंबई दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या सहकायनि या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गाडी क्रमांक ०६२७१ यशवंतपूर ते मडगाव ही गाडी २ एप्रिल रोजी यशवंतपूर येथून रात्री २३.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७.३० वाजता मडगावला पोहोचेल. गाडी क्रमांक ०६२७२ मडगाव ते बेंगळुरू कॅन्टोन्मेंट ही गाडी ५ एप्रिल रोजी मडगाव येथून सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंटला पोहोचेल.
ही गाडी कुणिगल, हासन, सुब्रमण्य रोड, मंगळुरू (बंतवाला), उडुपी, कुंदापुरा, मुरुडेश्वर, कारवार आणि काणकोण यासह अन्य प्रमुख स्थानकांवर ही गाडी थांबेल. गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई ते मडगाव ही ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर रविवारी पहाटे ००.५५ वाजता ही गाडी मुंबई सीएसएमटीवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.१५ वाजता मडगावला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०२० मडगाव ते मुंबई ही ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर रविवारी सायंकाळी १६ वाजता ही गाडी मडगाववरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी येथे थांबेल.