नाशिक

सप्तशृंगी गडावर हजारो कावडी धारकांचे आगमन 

गणेश सोनवणे

सप्तशृंगीगड(जि. नाशिक) : प्रतिनिधी : सप्तशृंगीगडावर दसऱ्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यामुळे आता कावडीधारकांना व भाविकांना कोजगिरी पौर्णिमेची आस लागली असून सप्तशृंगी गडावरती हजारो भक्तांचे व कावडीधारकांचे आगमन होताना दिसत आहे. सप्तशृंगीगडावर कोजगिरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व इतर ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात कावडीधारक येत असल्याने हा सोहळा अद्भुत असा होत असतो.

नवरात्रोत्सवा प्रमाणेच कोजगिरी पौर्णिमा हा कावडीधारकांचा सोहळा मोठ्या उत्साहात सप्तशृंगी गडावरती साजरा होत असतो.  गडावर कावडी धारकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. सप्तशृंगी गडावर विविध नद्यांचे जल घेऊन आई सप्तशृंगीला जलाचा महा अभिषेक केला जातो. यात पुणे येथील मुळा नदीचे जल, साक्री पिंपळनेर येथून तापी नदीचे, ओंकारेश्वर उज्जैन इंदोर येथून नर्मदेचे, भीमाशंकर येथून भीमा नदीचे, त्र्यंबकेश्वर नाशिक येथून गोदावरीचे व भारतातील विविध ठिकाणावरून कावडीधारक सप्तशृंगी गडावरती पायी चालत जल सप्तशृंगी गडाववरती घेऊन येत असतात.

कावडीधारक चारशे ते पाचशे किलोमीटर उन्हात पायी चालत सप्तशृंगीगडावर कोजागिरी पोर्णिमेच्या आदल्या दिवशी गडावरती येतात. रस्त्यावर ठिकठिकाणी कावडीधारकांसाठी दानशूर व्यक्तींकडून फराळासह पिण्याचे पाणी, चहाचे वाटप केले जाते. तसेच सप्तशृंगडावरती येणाऱ्या भक्तांसाठी विविध संस्थांकडून दूध, चहा आदींची व्यवस्था केली जाते. सप्तशृंगी गडावर येण्यासाठी नांदूरी ते सप्तशृंगी यादरम्यान एसटी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिरामध्ये दुरून येणारे कावडीधारकांकडून जेल घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी प्रशासन तर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.कोजागिरीला रात्री अकरा वाजता देवीला पंच अमृतासह आणलेल्या पवित्र विविध नद्यांच्या जलाने अभिषेक केला जातो.

सप्तशृंगी गडावरती दिवसेंदिवस कावडीधारकांची होत असलेली वाढती गर्दी पाहता या ठिकाणी देवी संस्थान तर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शनिवार व रविवारी अशी दोन दिवस सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात कावडीधारक व भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली आहे. यावेळी कावडी धारकांचे आगमन होत आहे.

तृतीयपंथीयांचा मेळावा

कावडीधारकांसह तृतीयपंथीयी देखील मोठ्या संख्येने गडावर येत असतात. त्यांचाही मेळाव येथे भरत असतो. त्याअनुशंगाने सप्तशृंगी गडावरती मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी दाखल झाले आहेत.

सप्तशृंगी देवी ही आमची कुलदैवत असल्याने याठिकाणी कित्येक वर्षांपासून मी येते. पण गडावर येणारे भाविक व आमच्या तृतीयपंथीयांसाठी सुविधा, निवासव्यस्था नसल्याने जादा पेसे देऊन रूम व पाणी उपलब्ध करून घ्यावे लागते. यासाठी शासनाने किंवा देवी संस्थानने या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.- श्याम दिदी, (तृतीयपंथीय, कल्याण )

सप्तशृंगी गडावरील आई भगवतीच्या अभिषेकासाठी आम्ही 200 कि.मी पायी प्रवास करून पवित्र नद्यांचे जल घेऊन आलो आहे. पण यावेळेस अभिषेक होतो की नाही किंवा आमच्या पाण्याने देवीला अंघोळ करता की नाही या भ्रमात आम्ही आहोत. याबाबत देवी संस्थान काय निर्णय घेता हे सांगणे कठीण आहे. – सुनिल वाघ, जळगाव

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT