God woman black magic case Pudhari
नाशिक

Anis Nashik Conference | नाशिकमध्ये राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषद

Anis Nashik Conference | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ३ एप्रिल रोजी आयोजन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषदेचे ३ एप्रिल रोजी खुटवडनगरमधील सीटू भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे.

न न . २ खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, भोंदंकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट, मानसिक छळासह लैंगिक शोषणाचे भीषण वास्तव चव्हाट्यावर आले आहे. खरात प्रकरणाचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात भोंदूगिरीचा प्रकार लज्जास्पद असून, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, तसेच जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व्हावा या हेतूने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उ‌द्घाटन खासदार वर्षा गायकवाड यंच्या हस्ते केले जाणार आहे.

परिषदेत प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयंत ढाके, कॉ. डी. एल. कराड, अॅड. रंजना गवांदे, दादा चांदणे, अंनिसचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनपर रॅलीचे आयोजन केले आहे.

रॅली हुतात्मा स्मारक येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. तेथे परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक तथा अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल.

परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे, विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, अरुण घोडेराव, सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे करीत आहेत.

राज्यभरातून ३०० प्रतिनिधी

परिषदेत काही संकल्प आणि निर्धार केले जाणार असून, परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. भोंद खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT