Ajit Pawar Death Pudhari
नाशिक

Ajit Pawar Death | सामान्यांचा 'वटवृक्ष' हरपल्याने राज्याचे मोठे नुकसान

Ajit Pawar Death | श्रद्धांजली अर्पण करताना आमदार डॉ. राहुल आहेर यांचे प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्वसामान्य जनतेसाठी मजबूत 'वटवृक्ष' होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राजकीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते घडले. दादांच्या आकस्मिक निधनावर आजही कोणाचाच विश्वास बसत नाही. अजितदादा यांच्यासारखे कर्तृत्ववान, सर्वपक्षीय व सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेणारे नेतृत्व घडण्यासाठी अनेक दशके लागतात. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढणे अशक्य आहे,

असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, कादवाचे संचालक सुखदेव जाधव, सुभाष शिंदे,

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर, प्रहारचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, सुनील कबाडे, खंडेराव आहेर, वडनेरभैरवचे सरपंच रावसाहेब भालेराव, निवृत्ती घाटे, अमोल भालेराव, डॉ. नितीन गांगुर्डे, डॉक्टर सेलचे डॉ. श्यामराव जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर, नीलेश ढगे, शांताराम ठाकरे, यांनी दिली.

योगेश ढोमसे, गणेश महाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव, नगराध्यक्ष वैभव बागूल, नगरसेवक संदीप उगले, प्रमोद बनकर, कैलास गुंजाळ, अनिल काळे, डॉ. भावराव देवरे, प्रभाकर ठाकरे, गोकुळ वाघ, गणेश महाले, शांताराम भवर, सचिन कुलकर्णी, चित्रा शिंदे, कल्याणी कुलकर्णी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणेगाव कालवा प्रकल्पासाठी भरघोस निधी

चांदवड तालुक्यातील पुणेगाव डावा कालवा प्रकल्पासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री असलेल्या अजितदादा पवार यांनी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या मागणीनुसार भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे वडाळीभोईपासून परसूलपर्यंत कालव्याचे पाणी पोहोचले, अशी माहिती यावेळी वडनेरभैरवचे सरपंच रावसाहेब भालेराव व तुकाराम सोनवणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT