सिडको (नाशिक) : त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित चार दिवसांच्या आयमा इंडेक्स २०२५ च्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शन बघण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. लोक गटागटाने येत होते. विद्यार्थी तसेच युवकांच्या प्रतिसादामुळे आयोजकांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहात होता. प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असलेला ड्रोन शो बघण्यास शुक्रवारी (दि. 28) रात्री 10 हजारांहून अधिक लोकांनी गर्दी केली होती.
नामांकित कंपन्यांचे अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी बीटूबी अंतर्गत सर्व स्टॉल्सना भेटी देऊन उद्योजकांच्या उत्पादनांची माहिती जाणून घेत त्यांच्या मालास उठाव कसा मिळेल, याबाबतची रणनीती सांगितली. आवश्यकता भासल्यास त्यांची उत्पादने खरेदी करण्याचे दिलेले अभिवचन हे या प्रदर्शनाचे फलित म्हणावे लागेल. प्रदर्शनात ३७५ उद्योजकांनी येथे स्टॉल्स थाटले आहेत.
न भूतो न भविष्यती
आयमा इंडेक्स २०२५ औद्योगिक प्रदर्शन न भूतो न भविष्यती असे होत असल्याचा आनंद आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेली मोलाची साथ आणि ३२५ स्टॉल्सचे उद्दिष्ट असतानाही ३७५ स्टॉल्स उभारावे लागले, यावरून उद्योजकांमध्ये किती दांडगा उत्साह आहे, हे दिसून येते.
प्रदर्शन यशस्वीतेसाठी अध्यक्ष ललित बुब, बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयमा महाकुंभ २०२५ चेअरमन वरुण तलवार, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, सहसचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, खजिनदार गोविंद झा, आयपीपी निखिल पांचाळ, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, मनीष रावळ, रवींद्र महादेवकर, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन दरंगे, धीरज वडनेरे, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवि श्यामदासानी, विनोद कुंभार, श्वेता चांडक, अलोक कानानी, नागेश पिंगळे, करणसिंग पाटील, रणजित सानप, सुरज आव्हाड, सुमित तिवारी, कमलेश उशीर, वेदांत राठी, मनोज मुळे आदी प्रयत्नशील आहेत.