AIMA Index 2025 : गुंतवणुकदारांसाठी दक्षिण आफ्रिकेची दारे खुली

उच्चायुक्त अनिल सुकलाल : आयमा इंडेक्स २०२५ चा शानदार शुभारंभ
सिडको (नाशिक)
सिडको : अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (औद्योगिक महाकुंभ) उद्घाटनप्रसंगी अनिल सुकलाल. समवेत दीपेंद्रसिंह कुशवाह, ललित बूब, वरूण तलवार, आयुष प्रसाद, अजित कुंभार, साकेत चतुर्वेदी, सोनू प्रभाकर व मान्यवर. (छाया : राजेंद्र शेळके)
Published on
Updated on

सिडको (नाशिक) : क्रिकेट आणि व्यापार संबंधातून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असून नाशिकच्या गुंतवणूकदारांसाठी दक्षिण आफ्रिकेची दारे सतत खुली आहेत. नाशिकचे उद्योजक तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतात, असे प्रतिपादन दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त अनिल सुकलाल यांनी केले.

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (औद्योगिक महाकुंभ) आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२८) शानदार सोहळ्याने दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त अनिल सुकलाल आणि उद्योग आयुक्त (विकास) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सिडको (नाशिक)
AIMA INDEX 2025 : आयमाच्या औद्योगिक महाकुंभाचा आज शुभारंभ

व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बूब, आयमा इंडेक्स २०२५ चे चेअरमन वरूण तलवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्तालयातील विपणन अधिकारी सोनू प्रभाकर, सोमालियाच्या दुतावासातील कौन्सिलर अब्दीरिसाक सैदनुर, जीटीटीसीआयचे संस्थापक अध्यक्ष गौरव गुप्ता, तैत्रा(मुंबई)चे संचालक विक लीन, समीर खले, अभिषेक नायर, दीपक बिल्डर्सच्या संचालिका वेदश्री चंदे, निमाचे अध्यक्ष आशीष नहार, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयपीपी निखिल पांचाळ, सचिव हर्षद बेळे, योगिता आहेर, कोषाध्यक्ष गोविंद झा, सुरज आव्हाड, नागेश पिंगळे, अभिषेक व्यास, जगदीश पाटील, रवी महादेवकर, श्वेता चांडक, मनीष रावल, दिलीप वाघ उपस्थित होते.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचे परस्पर संबंध दीर्घ काळापासून सौहार्दाचे असल्याचे सांगून सुकलाल यांनी महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याची आठवण करून दिली. भारत आणि दक्षिण आफ्रिका उद्योग क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवित आहेत. नाशिककरांना दक्षिण आफ्रिकेत कृषी, फूड प्रोसेसिंग व अन्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करून त्यांनी आयमाच्या गुंतवणूक महा कुंभाचे तोंडभरून कौतुक केले.

सिडको (नाशिक)
Indo-Poland Trade : इंडो-पोलंड व्यापारवृद्धीस आणखी गती देणार

महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे महत्वपूर्ण इंजिन असल्याचे एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले. नाशिकमधील विकासाचा दर सातत्याने वाढत असून गुंतवणूकदारांचे स्वागतच असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी संरक्षण क्षेत्रात एचएएलचे महत्व किती अगाध आहे हे सांगताना विविध उपक्रमांची माहिती दिली. आयमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी प्रास्ताविक भाषणात आयमाचा इतिहास नमूद करून औद्योगिक महा कुंभाचे महत्त्व विशद केले. सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले.

शुभारंभाच्या दिवशीच १५ गुंतवणूकदारांनी १ हजार ३३२ कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली. कार्यक्रमास आयमा संस्थापक भास्कर कोतवाल, माजी अध्यक्ष रमेश पवार, बिपीन बटाविया, जे. आर. वाघ, धनंजय बेळे, संदीप सोनार, विवेक पाटील, राजेंद्र अहिरे, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन डरंगे, धीरज वडनेरे, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवी शामदासांनी, विनोद कुंभार, अलोक कानांनी, करणसिंग पाटील, रणजित सानप, सुमित तिवारी, कमलेश उशीर, वेदांत राठी, मनोज मुळे, संजय सोनवणे, रमेश वैश्य, मंगेश पाटणकर, विविध असोसिएशनचे अधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news