Why is Navratri 10 days in 2025?
नाशिक : यंदाचा गणेशोत्सव दहाऐवजी ११ दिवसांचा साजरा झाल्यानंतर आता नवरात्रोत्सवही दहा दिवसांचा असणार आहे. तृतीया तिथीची वृद्धी आल्यामुळे हा शारदीय नवरात्रोत्सव नऊ नव्हे तर दहा दिवस असणार आहे.
अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सोमवारी (दि. २२) प्रारंभ होत आहे. नवरात्री साधरणतः नऊ दिवसांचा उत्सव असतो. मात्र, तिथीचा क्षय अथवा वृद्धी यामुळे हा उत्सव आठ किंवा दहा दिवसांचाही होऊ शकतो. यंदा असेच झाले आहे. तृतीया तिथीची वृद्धी आल्यामुळे दहा दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. यंदा २४ आणि २५ सप्टेंबर अशा दोन्ही दिवशी तृतीया आहे.
वर्षभरात चार प्रकारचे नवरात्र येतात. त्यापैकी अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व आहे. या काळात देवीची आराधना, उपवास आणि विविध धार्मिक विधी केले जातात. उपवास नऊ दिवस पाळणे शक्य नसल्यास पहिल्या किंवा शेवटच्या दिवशी उपवास केला तरी धार्मिक मान्यता असल्याचे धर्म अभ्यासक सांगतात.
२६ सप्टेंबर : ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन
२९ सप्टेंबर : दुर्गाष्टमी
३० सप्टेंबर : महाष्टमी उपवास
२ ऑक्टोबर : विजयादशमी
हा नवरात्रोत्सव पूर्ण १० दिवस असेल, असा योग २७ वर्षांनंतर आला आहे. देवीच्या आगमनाचे जसे वाहन असते, यावरून भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधता येतो. यंदा हत्तीवरून देवीचे आगमन आहे. सामाजिक दृष्टीने संपत्ती, सौख्य, आनंद याचेच हे संकेत आहे.- डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक, नाशिक