Notepress dummy recruitment case : नोटप्रेस डमी भरतीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा File Photo
नाशिक

Notepress dummy recruitment case : नोटप्रेस डमी भरतीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा

नाशिकरोड येथील करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नोकरभरती परीक्षेत प्रॉक्सी उमेदवार बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविण्याचा धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

7 people charged in Notepress dummy recruitment case

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड येथील करन्सी नोटप्रेसमध्ये झालेल्या नोकरभरती परीक्षेत प्रॉक्सी उमेदवार बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, हे सर्व आरोपी बिहारमधील रहिवासी आहेत. सध्या त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.

कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण/नियंत्रण), कनिष्ठ टेक्निशियन (कार्यशाळा/इलेक्ट्रिकल) व पर्यवेक्षक या पदांसाठी १३ मार्च २०२२ ते ४ मार्च २०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. पवईतील आयओएन डिजिटल झोन, आयटी पार्क येथे ही परीक्षा झाली. या परीक्षेसाठी आरोपींनी डमी उमेदवारांना बसवून परीक्षा दिली, तसेच त्यानंतर बनावट आयटीआय आणि इलेक्ट्रिकल डिप्लोमा प्रमाणपत्रे सादर करत सरकारी नोकरी मिळवली, असे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे.

या प्रकरणी करन्सी नोटप्रेसचे उपप्रबंधक (विधी) विक्रमसिंग चौधरी यांनी पवई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ३० जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. रवि रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार आणि आशुतोष कुमार या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते या भरती घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. सदर प्रकरणात गंभीर स्वरूपाच्या फसवणूक, बनावट कागदपत्रे व सरकारी सेवेत गैरमागनि प्रवेश अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT