Afghanistan Earthquake pudhari
नाशिक

Nashik Earthquake | "नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के! 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद"

Nashik Earthquake | जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे धक्के; 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद : सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण तालुके हादडले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक/वणी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण तालुक्यांत काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून, त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ नोंदवली गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात वांजूळपाडा, हरणटेकडी, शिंदे, मोहपाडा या भागांत शनिवारी (दि. २५) ही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.

कळवण तालुक्यातील दळवट येथे रात्री ११.५६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तसेच घराचे पत्रे, भिंत, खिडकी या वस्तूंची सुमारे २० ते ३० सेकंद हालचाल जाणवली. त्याचप्रमाणे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर, सुरगाणा शहरात शनिवारी रात्री ११.५५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

सराड, चिखली, बोरगाव परिसरात शनिवारी रात्री २.४५ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे सराड येथील आश्रमशाळेच्या भिंतीला तडे गेले आहेत.

दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बाडगीचा पाडा परिसरात गुरुवारी रात्री ११.५५ च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून, पेठ तालुक्यातील शिवशेत गाव परिसरात शनिवारी (दि. २५) सौम्य भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे.

"नाशिकच्या पश्चिम भागात काही फॉल्ट (भेगा) आहेत. त्यांच्यावर सतत ताण येत असतो. त्यामुळे असे धक्के जाणवू शकतात. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे."
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT