उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सिन्नरला दिवसाआड 40 मिनिटे पाणीपुरवठा; मुख्याधिकारी केदार यांचे आश्वासन

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : कडवा, दारणा धरणात मुबलक पाणीसाठा असताना सिन्नरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. या विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन केले हेते. या आंदोलनात मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर नगर परिषदेने दिवसाआड 40 मिनिटे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आखले आहे. भाजपच्या आंदोलनाची यश आल्याचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, प्रभारी जयंत आव्हाड, शहरप्रमुख मनेज शिरसाट यांनी सांगितले.

शहर व उपनगरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त होते. त्यामुळे भाजपने नगर परिषदेत मुख्याधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. नगरपालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असून, नागरीकांनी पाणी वेळेवर भरावे. वाया घालवू नये. पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन महिला शहराध्यक्ष मंगला झगडे, रोहिणी कुरणे, मदन बिन्नर, शरद जाधव, सुमन जोशी आदींनी केले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT