उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी ठेवून गुणवत्ता वाढीसाठी लक्ष द्यावे – ॲड. नितीन ठाकरे

अंजली राऊत

नाशिक (देवळाली कॅम्प) : प्रतिनिधी

मानवी जीवनाच्या गरजा व्यापक झालेल्या आहे. त्या सोडविण्यासाठी शिक्षण हेच प्रमुख माध्यम आहे. याविषयी नविन शैक्षणिक धोरणात नोंद घेतली आहे. प्राध्यापक आणि शिक्षण संस्था यांना सामाजिक बांधिलकी ठेवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात सोमवारी (दि.२७) हंसाबेन तेजुकाया यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर मविप्रचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश आबा पिंगळे, सेवक संचालक एस. के. शिंदे, प्राचार्य एस. एस. काळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष कांतीभाई तेजुकाया, देणगीदार अलका सावला, हिरांची सावला, जयश्री शहा, कुंतल पटेल, कविता पुजारा आदी उपस्थित होते. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, देणगीदार कांतीभाई तेजुकाया तसेच अलका सावला यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कायम प्रेरणादाई काम केले. महाविद्यालयातील पायाभूत सुविधांसाठी देखील ते सतत अग्रभागी असतात. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. विकास समितीचे अध्यक्ष कांतीभाई तेजुकाया यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत पुणे जिल्हयातील नारायण गांव महाविद्यालयातील विद्यार्थी सिध्दी श्याम अरविकर हीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकविले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक के. पी. जे. महाविद्यालयाची रकीना पांडुरंग अगिवाले, तिस-या क्रमांकाचे पारितोषिक राजश्री दिलीप गायधनी या विद्यार्थील मिळाले. कस्तीमध्ये सोनी चंदसिंग राठोड तर सॉप्ट स्किलमध्ये प्रियंका कुशवाह यांना पारितोषिक मिळाले, गरीब विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती गायत्री गोडसे, वैष्णवी पराड, महेश राव, दिपाली आडके यांना मिळाली. सुत्रसंचालन उपप्राचार्य डी. टी. जाधव यांनी केले. आभार श्याम जाधव यांनी मानले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT