राहुल गांधी यांचा आवाज दाबता येणार नाही : बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

मुंबई; पुढारी वृत्तसंस्था :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रश्नांना घाबरून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. पण, त्यांचा आवाज काही केल्या दाबता येणार नाही, अशा शब्दांत पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला सुनावले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसने रविवारी राज्यभरात संकल्प सत्याग्रह केला. मुंबईसह राज्यभरात काँग्रेस नेते या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण मुंबईत सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

आजचा सत्याग्रह एका नव्या आंदोलनाची सुरुवात आहे, स्वातंत्र्याच्या नव्या लढाईची सुरुवात आहे. अदानी समूहाच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काय संबंध आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केला. पण यावर नरेंद्र मोदींनी उत्तर दिले नाही, याकडे थोरात यांनी लक्ष वेधले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपुरातील आंदोलनात उपस्थित होते. राजकीय आकसातून राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला.

मुंबईत आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयाजवळ थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबई, पालघर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे, वाशिम, यवतमाळ, परभणीसह सर्व जिल्ह्यात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. सोमवारीही काही जिल्ह्यात आंदोलन केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news