नांदगाव : दिव्यांगांना युनीक कार्डाचे वाटप करताना गटविकास अधिकारी गणेश चौधरी. समवेत देवीप्रसाद मांडवडे, सुनिल खैरणार आदी पदाधिकारी. (छाया: सचिन बैरागी) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : नांदगावी सेवा पंधरवड्यातून विविध सेवा देण्याच्या कामकाजाला वेग

अंजली राऊत

नांदगाव: पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने प्रशासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या दरम्यान व्यापक प्रमाणावर सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.

दरम्यान, सर्व शासकीय विभाग आपल्याकडील विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देत आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता 'सेवा पंधरवडा' आयोजित करणेबाबत शासनस्तरावरून कळविण्यात आले असून, या अनुषंगाने नांदगाव तालुक्यात सेवा पंधरवड्यानिमित्त नागरिकांना विविध सेवा देण्याचे कामकाज वेगात सुरु आहे. नांदगाव पंचायसमितीच्या वतीने गटविकास आधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरवड्यात आपले सरकार सेवा केंद्र प्रलंबित तक्रारी ४४, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र- २७१०, इतर सेवा १८१, विवाह नोंदणी दाखले ५५, मालमत्ता हस्तांतरण दाखले ५१,मालमत्ता कर आकारणी २७९, लंपी रोगप्रतिबंधक लसीकरण -६०१८८, दिव्यांगाना UDID Card अशा विविध सेवा देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी सांगीतले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अभियान-२०२२ अंतर्गत ग्रामपंचायत गंगाधरी ता. नांदगाव येथे गणेश चौधरी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थीना Unik card घरपोच वाटप करणेत आले. त्याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी देवीप्रसाद मांडवडे, ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सुनिल खैरणार, ग्रामसेवक  भाबड व दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT