रुग्णवाहिकेने घेतला पेट,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सिडकोत रुग्णवाहिकेने अचानक घेतला पेट

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

द्वारकाकडून मुंबईकडे जाणाऱ्या उड्डाण पुलावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेने काल दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली होती. परंतु रुग्णवाहिकेतील अग्निशमन यंत्रामुळे व जागरूक नागरिकांमुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, केजीएन ॲम्ब्युलन्स सव्र्हिस यांची ॲम्ब्युलन्स (एमएच १५ एचएच ०६५३) या नंबरची ॲम्ब्युलन्स आरटीओ ऑफिसकडून लेखानगरकडे जाताना इंदिरानगर येथील हायवेवर गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने यावेळी ॲम्ब्युलन्समध्ये कोणतेही रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली. या वेळी अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेची आग आटोक्यात आणली. याबाबत अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली असून रुग्णवाहिकेस शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT